Accident: पुणे सोलापूर महामार्गावर गतिरोधकावरून दुचाकी उडून तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 14:23 IST2023-03-15T14:22:51+5:302023-03-15T14:23:45+5:30

तक्रारवाडी येथील यात्रेनिमित्ताने तीन तरुण एकाच दुचाकीवरून हायवेने चालले होते

A young man died after his bike flew over a traffic jam on the Pune Solapur highway | Accident: पुणे सोलापूर महामार्गावर गतिरोधकावरून दुचाकी उडून तरुणाचा मृत्यू

Accident: पुणे सोलापूर महामार्गावर गतिरोधकावरून दुचाकी उडून तरुणाचा मृत्यू

भिगवण : पुणे सोलापूर महामार्गावरील मदनवाडी गावच्या हद्दीत सकुंडे वस्ती शेजारील सर्व्हिस रस्त्यावरील गतिरोधकावरुन् दुचाकी उडाल्यामुळे एका तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली. धनंजय दामोदर धुमाळ (वय.22 रा.कुंभारगाव) असे अपघातात जीव गमाविलेल्या तरुणांचे नाव आहे.तर भारत पांडुरंग पोंद्कुले वय 23 तसेच किशोर दत्तात्रय घोडके 22 रा.कुंभारगाव हे दोन तरुण जखमी झाले आहेत.

तीनही तरुण डाळज येथील यात्रेतून तक्रारवाडी येथील यात्रेनिम्मित मनोरंजनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी दुचाकीवरून जाताना पुणे सोलापूर महामार्गाच्या शेजारी असणाऱ्या सर्व्हिस रस्त्यावरील गतिरोधकावर दुचाकी आदळून हा अपघात घडला. धनंजय डोक्याच्या बाजूला आपटल्यामुळे मनक्याला जोरदार मार लागल्याने गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी भिगवण येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. तर त्याच्या सोबत असणाऱ्या भारत आणी किशोर यांना किरकोळ जखमा झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली असून पोलीस जमादार समीर करे तपास करित आहेत. 

सर्व्हिस रस्त्यावर असणाऱ्या या गतिरोधका विषयी कोणत्याही सूचना फलक अथवा सावधानतेचे पट्टे न लावल्यामुळे हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर याठिकाणी असणाऱ्या अनधिकृत व्यवसाय वाढीस लागावे यासाठी सर्व्हिस रस्त्यावर चुकीचे गतिरोधक उभारले आहेत काय? असा सवाल नागरिक करत आहेत.

Web Title: A young man died after his bike flew over a traffic jam on the Pune Solapur highway