दारूच्या नशेत टेरेसवरून उडी घेत तरुणाची आत्महत्या; आळंदीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 15:14 IST2023-03-22T15:14:36+5:302023-03-22T15:14:43+5:30

तरुण मजुरीचे काम करत होता

A young man commits suicide by jumping from the terrace while drunk Events in Alandi | दारूच्या नशेत टेरेसवरून उडी घेत तरुणाची आत्महत्या; आळंदीतील घटना

दारूच्या नशेत टेरेसवरून उडी घेत तरुणाची आत्महत्या; आळंदीतील घटना

आळंदी : आळंदी-देवाची (ता. खेड) येथे सत्तावीस वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत बिल्डींगच्या टेरेसवरून खाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना मंगळवारी (दि.२१) पहाटे चारच्या सुमारास आळंदीतील भाजी मंडईजवळील दत्त मंदिर परिसरात घडली. संदेश उर्फ अक्षय श्रीकृष्ण बेलसरे (वय २७, मूळगाव रा. तुळजापुर, ता. चांदुर रेल्वे, जि. अमरावती) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. 

संदेश हा मजुरीचे काम करत होता. मात्र, तो दररोज जास्त दारू पिऊन विनाकारण वेड्यासारखे बडबड करत असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान, सोमवारी रात्री नऊच्या सुमारास संदेश हा दारू पिऊन मला मरायचे आहे, अशी मोठमोठ्याने बडबड करत होता. त्यानंतर मंगळवारी पहाटेच्या सुमारास संदेशने बिल्डींगच्या टेरेसवरून खाली उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी समीर शकीर अन्सारी यांनी पोलिसांत माहिती दिली आहे. दरम्यान, आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गोडसे व अन्य सहकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. पुढील तपास आळंदी पोलिस करत आहेत.

Web Title: A young man commits suicide by jumping from the terrace while drunk Events in Alandi