महिलेचा खून करून मृतदेह टाकला विहिरीत; हडपसर मधील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 13:19 IST2023-04-26T13:19:03+5:302023-04-26T13:19:35+5:30

महिला हडपसर भागातील शेतात कामगार म्हणून काम करत होत्या

A woman was killed and the body was thrown into a well Shocking incident in Hadapsar | महिलेचा खून करून मृतदेह टाकला विहिरीत; हडपसर मधील धक्कादायक घटना

महिलेचा खून करून मृतदेह टाकला विहिरीत; हडपसर मधील धक्कादायक घटना

पुणे : हडपसर परिसरातील मांजरी भागात एका महिलेचा खून करून तिचा मृतदेह विहिरीत टाकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. गेल्या २४ तासात शहरात तीन खून झाल्याने खळबळ उडाली आहे.

उषा अशोक देशमुख (वय ५०, रा. माळवाडी, कवडीपाट, हडपसर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत स्रेहल अभय काळभोर (वय ५०, रा. मांजरी फार्म, मांजरी) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना मांजरी येथील कुरण फार्म येथे सोमवारी घडली.

फिर्यादी यांच्या शेतात उषा देशमुख या गेल्या २५ वर्षांपासून कामगार म्हणून काम करत होत्या. सोमवारी त्या नेहमीप्रमाणे कामाला आल्या होत्या. शेतात त्यांनी शेळ्या सोडल्या होत्या. सायंकाळ झाली तरी त्या न आल्याने त्यांचे पती त्यांना शोधत शेतात गेले. तेव्हा शेळ्या तेथे दिसल्या. परंतु, त्या दिसून आल्या नाहीत. तेथील विहिरीत त्यांनी डोकावून पाहिल्यावर उषा यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी मालकीण स्नेहल काळभोर यांना कळविले. उषा यांच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून त्यांचा खून केला असल्याचे व त्यानंतर मृतदेह विहिरीत टाकून दिल्याचे दिसून आले. हडपसर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलिस निरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.

Web Title: A woman was killed and the body was thrown into a well Shocking incident in Hadapsar