कात्रज तलावात रात्री एका महिलेची उडी; सकाळी सापडला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 15:09 IST2024-03-17T15:09:39+5:302024-03-17T15:09:53+5:30

महिला अंदाजे 22 ते 24 वर्षाची असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले

A woman jumps into Katraj Lake at night The body was found in the morning | कात्रज तलावात रात्री एका महिलेची उडी; सकाळी सापडला मृतदेह

कात्रज तलावात रात्री एका महिलेची उडी; सकाळी सापडला मृतदेह

कात्रज : कात्रज येथील नानासाहेब पेशवे तलावात शनिवारी रात्रीच्या सुमारास एका महिलेने तलावात उडी मारल्या संदर्भात अग्निशमन दलाला रात्री साडेबाराच्या वेळी कॉल मिळाला कात्रज अग्निशमन दलाच्या जवानांकडून व पोलिसांकडून तलावात बोटीच्या साहाय्याने दोन ते तीन तास शोध घेण्यात आला परंतु रात्रीच्या वेळी मृतदेह मिळून आला नाही. 

त्यामुळे अग्निशमन दला कडून सकाळच्या वेळी सात वाजता शोध घेण्यात आला. शोध मोहिमे दरम्यान मृतदेह गळाला लागला त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांकडून  महिलेचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही.पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्यात येत आहे असे सांगण्यात आले तसेच महिलेचा मृतदेह पुढील तपासणीसाठी ससून येथे पाठवण्यात आला आहे. अंदाजे 22 ते 24 वर्षाची महिला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

Web Title: A woman jumps into Katraj Lake at night The body was found in the morning