Pune Crime: पुणे शहरातील दांडेकर पुलाजवळ डोक्यात दगड घालून एकाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 17:08 IST2023-05-24T17:08:09+5:302023-05-24T17:08:54+5:30
बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली...

Pune Crime: पुणे शहरातील दांडेकर पुलाजवळ डोक्यात दगड घालून एकाचा खून
- किरण शिंदे
पुणे : दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दांडेकर पुलाजवळ एका व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. सुनील विठ्ठल मोरे (वय 51, आजाद मित्र मंडळ जवळ जनता वसाहत पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दत्तवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजिंक्य सुनील मोरे (वय 20) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, दांडेकर पुलाकडून जनता वसाहत कॅनॉलकडे जाणाऱ्या रस्त्यावर आज पहाटेच्या सुमारास रक्ताच्या थारोळ्यात सुनील मोरे यांचा मृतदेह पडला होता. सुनील मोरे पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांचा प्रकार मृतदेहच सापडला. कुणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी त्यांच्या डोक्यात दगड मारून खून केला आहे. दत्तवाडी पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.