धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 23:08 IST2025-11-02T23:01:15+5:302025-11-02T23:08:46+5:30
पश्चिम बंगालमध्ये आणखी एक सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. ही घटना कोलकाता येथील दम दम परिसरात घडली. एका सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला.

धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
पश्चिम बंगालमध्ये आणखी एक सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. कोलकाता येथील दम दम परिसरात ही घटना घडली. येथे सातवीत शिकणाऱ्या एका मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी तीन तरुणांना अटक करण्यात आली. शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. विद्यार्थिनी ट्यूशनवरून घरी परतत होती त्यावेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले.
आरोपींपैकी एकाने तिला एका पार्कमध्ये नेले, तिथे आणखी दोन जण दाखल झाले.
मुलीला जबरदस्तीने ई-रिक्षात बसवण्यात आले आणि काही अंतरावर असलेल्या झोपडीत नेण्यात आले, तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. नंतर तिन्ही आरोपींनी मुलीला सोडून दिले, यावेळी त्या तिघांनी मुलीला धमकी दिली. मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
भाजपने कारवाईची मागणी केली
तिन्ही आरोपींविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून बाल संरक्षण (POCSO) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी रात्री त्यांना दमदम परिसरातून अटक करण्यात आली. भाजप कार्यकर्त्यांनी रविवारी दमदम पोलिस ठाण्याबाहेर निदर्शने केली आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.