कात्रज तलावात आढळून आला पुरुषाचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 16:07 IST2022-11-06T15:25:31+5:302022-11-06T16:07:07+5:30

अग्निशामक दलाच्या पाच जवानांकडून पुरुषाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला

A man body was found in Katraj lake | कात्रज तलावात आढळून आला पुरुषाचा मृतदेह

कात्रज तलावात आढळून आला पुरुषाचा मृतदेह

कात्रज : कात्रज येथील नानासाहेब पेशवे तलावात रविवारी (दि ६ ) दुपारच्या सुमारास  सुरक्षारक्षक शेखर दिघे यांना अनोळखी पुरुषाचा मृतदेह (वय ४५ अंदाजे) पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आले. सुरक्षा रक्षकाडून याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली. पोलीस प्रशासन तसेच अग्निशमन दलाला माहिती मिळताच घटनास्थळावर कात्रज मार्शल पोलीस नाईक संतोष कदम, हवालदार राजेश गोसावी घटनास्थळी पोहचले. अग्निशामक दलाच्या पाच जवानांकडून पुरुषाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नसून पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. मृतदेह पुढील तपासणीसाठी ससून येथे पाठवण्यात आला. 

यावेळी अग्निशामक दलाकडून केंद्रप्रमुख संजय रामटेके,शेखर एरफुले ड्रायव्हर, पंकज इंगवले, शेलार,गडसी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक (गुन्हे ) विजय पुराणिक, पोलीस उपनिरीक्षक अतुल थोरात घटना स्थळी पोहचून पुढील तपास सुरु आहे.महिनाभरातील तिसरी घटना असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: A man body was found in Katraj lake