शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
3
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
4
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
5
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
6
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
7
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
8
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
9
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
10
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
11
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
12
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
13
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
14
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
15
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
16
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
17
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
18
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
19
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका

आषाढी वारी | पुणे जिल्ह्यातील वातूंडे गावच्या भातशेतात साकारली विठ्ठलाची भव्य मूर्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2022 12:04 PM

दर्शन घेण्यासाठी विविध गावातील भाविक वातुंडेत येत आहेत...

पौड (पुणे) : मुठा खोऱ्यातील वातुंडे गावचे रहिवासी ह.भ.प. बाळकृष्ण महाराज शिंदे आणि त्यांच्या पत्नी प्राथमिक शाळा शिक्षिका लक्ष्मी  शिंदे या दाम्पत्याने आपली विठ्ठलाप्रति असलेली भक्ती अनोख्या पद्धतीने व्यक्त केली आहे. आपल्या शेतात १२० x ६० फूट एवढी भव्य अशी भात रोपातून पांडुरंगाची सजीव मुर्ती तयार करून त्याचे दर्शन संपूर्ण महाराष्ट्राला घडविले आहे.

पंढरीची वारी करता आली नाही ही खंत न वाटू देता शिंदे दाम्पत्यांनी साक्षात  देवालाच आपल्या शेतात उभे केले असल्याची भावना येथील ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. त्यांच्या या भक्तिमय कलेची दखल विविध माध्यमांनी घेतली असून या भात रोपांनी सगुण साकार रुपात प्रकटलेल्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी विविध गावातील भाविक वातुंडे येथे येत आहेत.

यावेळी बोलताना बाळकृष्ण शिंदे म्हणाले की, देवाला फक्त भक्तीने जवळ करता येते बाकी सगळ खोटं आहे. म्हणून तर सावता माळी त्याला भाजीत पाहतात, जनाबाई त्याला शेणाच्या गोवऱ्यांमध्ये, मीराबाई विषाच्या पेल्यात, कबीर महाराज शेल्यामध्ये. इश्वर आपल्या कायम जवळ आहे फक्त आपण तो पाहिला पाहिजे याच भावनेने आम्ही ही जिवंत मूर्ती आपल्या शेतात तयार करण्याचा संकल्प केला. त्याला ग्रामस्थ व निसर्गाने मोलाची साथ दिल्याने आम्हाला साक्षात भगवंताने दर्शन दिल्याने खूप आनंद होत आहे.

टॅग्स :PuneपुणेPaudपौडPandharpurपंढरपूरAshadhi Ekadashiआषाढी एकादशी