शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
2
झारखंडच्या बोकारोमध्ये चमकम! सुरक्षा दलांनी ६ नक्षलवाद्यांना ठार केले
3
राज्य सरकार हिंदीचा प्रचार का करतंय?; २२ शैक्षणिक संघटनांचा हिंदी सक्तीला विरोध
4
Stock Market Today: ३४९ अंकांच्या तेजीसह उघडला Sensex, बँक निफ्टीचा रेकॉर्ड; रियल्टी-हेल्थकेअरमध्ये मोठी तेजी
5
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
6
NAV म्हणजे नक्की काय हो? Mutual Fund मध्ये गुंतवणूक करत असाल तर हे माहितच हवं
7
महाराष्ट्रात सौर ऊर्जा क्रांती, राज्याला महत्त्वपूर्ण यश; ८,४५० मेगावॅट वीजनिर्मिती
8
Post Office ची कमालीची सेव्हिंग स्कीम; गुंतवणूक करा आणि महिन्याला २० हजारांचं पेन्शन फिक्स
9
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
10
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
11
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
13
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
14
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन
15
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
16
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
17
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
18
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
19
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
20
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...

आळंदीच्या वेशीवर बिबट्या आल्याने नागरिक धास्तावले; दिवसाढवळ्या होतंय दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 17:15 IST

आळंदीच्या वेशीवर बिबट्या येऊन ठेपला असून विश्रांतवड परिसरात एका कुत्र्याची शिकारी बिबट्याने केली आहे...

- भानुदास पऱ्हाड

आळंदी (पुणे) : खेड तालुक्यात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अगदी दिवसा - ढवळ्या नागरिकांना बिबट्या नजरेस पडत आहे. विशेषतः मानवी वस्तीत बिबट्याचा शिरकाव वाढल्याचे चित्र आहे. मागील आठवड्यात वडगाव - घेनंद परिसरातील नागरिकांना बिबट्या दिसत होता. मात्र सद्यस्थितीत गजबजलेल्या तीर्थक्षेत्र आळंदीच्या वेशीवर बिबट्या येऊन ठेपला असून विश्रांतवड परिसरात एका कुत्र्याची शिकारी बिबट्याने केली आहे.

खेड तालुक्यातील वडगाव - घेनंद, मोहितेवाडी, कोयाळी - भानोबाची, साबळेवाडी, मरकळ, बंगलावस्ती, दौंडकरवाडी, रामनगर, चिंचोशी, सिद्धेगव्हाण, चऱ्होली खुर्द आदी ठिकाणी नागरिकांना बिबट्याचे सातत्याने दर्शन होत आहे. साबळेवाडीलगत असलेल्या वाजेवाडी परिसरात बिबट्याचा कायमस्वरूपी मुक्काम असून नुकतीच बिबट्याची पिल्लेही आढळून आली आहेत. तर सोमवारी (दि.७) रात्री सातकरस्थळ हद्दीत ऍड. गिरीष कोबल यांच्या घरी बिबट्या थांबल्याचे आढळून आले. तसेच पऱ्हाडवाडी येथे सोमवारी मध्यरात्री बिबट्याने कुत्र्यावर हल्ला चढवला. बिबट्या व कुत्र्यामध्ये झालेली झटापट येथील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

एकंदरीतच सर्व भागात बिबट्याचा वावर वाढत असल्याची सत्यस्थिती आहे. मागील अनेक महिन्यांपासून खेडच्या पूर्व भागातील अनेक गावांमधील बागायती पट्ट्यात बिबट्याचा वावर असल्याचे अनेक घटनांमधून उघड झाले आहे. आळंदी व वडगाव - घेनंद परिसरात वारंवार दिसणाऱ्या बिबट्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरत आहे. दोन आठवड्यांपूर्वी वडगाव - घेनंद  परिसरात बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ला केला आहे. तर परिसरातील पाळीव कुत्री वारंवार बिबट्याची शिकार होत आहेत.  परिणामी बिबट्याच्या दहशतीने स्थानिकांमध्ये भीती भरली असून वनविभागाने उपाययोजना कार्यान्वित करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.    वनविभागाकडून पाहणी व जनजागृती...

सध्या खरीप हंगामातील शेतकामे सुरू आहेत. मात्र बिबट्याच्या व मादीच्या वास्तव्याने नागरिकांमध्ये भीती पसरली असून शेतकामात अडथळे येत आहेत. यापार्श्वभूमीवर वनविभाग अधिकाऱ्यांनी आळंदीत येऊन सीसीटीव्ही फुटेजची व परिसराची पाहणी केली. तसेच स्थानिक नागरिकांमध्ये जनजागृती केली. 

आळंदीच्या वेशीवर बिबट्या वावरत असल्याने भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने दोन ठिकाणी पिंजरे लावले आहेत. बिबट्याला जेरबंद करणे गरजेचे आहे. कारण यापूर्वी काही ठिकाणी पाळीव प्राण्यांवर हल्ले झाले आहेत. मनुष्यहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वनविभागास आमचे सहकार्य राहील.- अनिकेत कुऱ्हाडे, ग्रामपंचायत सदस्य चऱ्होली.

 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडleopardबिबट्या