भर रस्त्यात घेतले मैत्रिणीचे चुंबन; लग्न केले नाही, तर जीव देण्याची दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2023 16:53 IST2023-03-12T16:53:37+5:302023-03-12T16:53:44+5:30

‘माझ्याशी लग्न कर, नाहीतर मी जीव देईल आणि तुझेही नीट होऊ देणार नाही,

A friend kiss taken on the road Threatened to kill if not married | भर रस्त्यात घेतले मैत्रिणीचे चुंबन; लग्न केले नाही, तर जीव देण्याची दिली धमकी

भर रस्त्यात घेतले मैत्रिणीचे चुंबन; लग्न केले नाही, तर जीव देण्याची दिली धमकी

पुणे : मैत्रीचे संबंध असताना बस स्टॉपजवळ अल्पवयीन मुलीशी लगट करून तिचे भर रस्त्यात चुंबन घेतले. त्याला तिने विरोध केल्याने माझ्याशी लग्न कर, नाहीतर जीव देईन, अशी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत कात्रज येथील एका १७ वर्षीय मुलीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी शुभम गंगाधर शेडगे (वय २२, रा.नायगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २८ फेब्रुवारीपासून शनिवारपर्यंत घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम हा फिर्यादी यांच्या ओळखीचा असून, त्यांच्यात मैत्रीचे संबंध होते. फिर्यादी या कात्रज बसस्टॉपजवळ असताना शुभम तेथे आला. त्याने फिर्यादी यांच्याशी शारीरिक लगट करून तिचे चुंबन घेतले आणि लज्जास्पद वर्तन केले. फिर्यादी यांनी त्याला विरोध केल्यावर त्याने ‘माझ्याशी लग्न कर, नाहीतर मी जीव देईल आणि तुझेही नीट होऊ देणार नाही,’ असे म्हणून फिर्यादीचा घरापर्यंत पाठलाग केला. तिच्या वडिलांना शिवीगाळ करून धमकी दिली. त्यानंतर, त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक तावडे तपास करीत आहेत.

Web Title: A friend kiss taken on the road Threatened to kill if not married