मुंढवा केशवनगर ते खराडी बायपास रस्त्यावर उड्डाणपूल होणार; १२६ कोटींच्या निविदेला स्थायीची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 13:34 IST2026-03-18T13:32:50+5:302026-03-18T13:34:05+5:30

मुंढवा केशवनगर ते खराडी बायपास या रस्त्यावर एकूण १,०८० मीटर लांबीच्या पुलावरील मुख्य पूल ७९६ मीटर लांबीचा असेल

A flyover will be constructed on the Mundhwa Keshavnagar to Kharadi bypass road; Permanent approval for the tender of Rs 126 crores | मुंढवा केशवनगर ते खराडी बायपास रस्त्यावर उड्डाणपूल होणार; १२६ कोटींच्या निविदेला स्थायीची मंजुरी

मुंढवा केशवनगर ते खराडी बायपास रस्त्यावर उड्डाणपूल होणार; १२६ कोटींच्या निविदेला स्थायीची मंजुरी

पुणे : मुंढवा केशवनगर ते खराडी बायपास या रस्त्यावर महात्मा फुले चौकात उड्डाणपूल उभारण्यास १२६ कोटी ६३ लाख रुपयांच्या निविदेला स्थायी समितीने मान्यता दिली. या प्रकल्पामुळे मुंढवा, केशवनगर, खराडी आणि परिसरातील वाहतूक सुरळीत होईल. या प्रकल्पातच प्रस्तावित मेट्रो मार्गिकेचाही अंतर्भाव केला जाणार आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

मुंढवा केशवनगर ते खराडी बायपास या रस्त्यावर एकूण १,०८० मीटर लांबीच्या पुलावरील मुख्य पूल ७९६ मीटर लांबीचा असेल. खराडीच्या बाजूस १३६ मीटर तर मुंढव्याकडील बाजूस १४८ मीटरचे ॲप्रोच रस्ते असतील. हा पूल १६ मीटर (दोन्हीकडे आठ मीटर) रुंद असेल. पुलावर ३६ पीअर्स असतील त्यातील २८ रस्त्यावर तर ८ नदीपात्रात असतील. उड्डाणपुलाचा खर्च, वस्तू व सेवा कर, रॉयल्टी फी व गुणवत्ता तपासणी आदीचा विचार करून तडजोडीने १२६ कोटी ६३ लाख ३६ हजार १०३ रुपयांच्या निविदेला मान्यता देण्यात आली आहे. ‘शहरातील मेट्रोला प्रवाशांची पसंती मिळत आहे. केंद्र व राज्य सरकारने मेट्रोच्या विस्ताराला प्राधान्य दिले आहे. त्यानुसार मगरपट्टा ते खराडी मार्गावर मेट्रोचा प्रस्ताव आहे. वाहने व मेट्रो यासाठी हा एकात्मिक दुमजली पूल असेल. महामेट्रो प्रशासनाशी चर्चा करून काम केले जाणार आहे. खालून वाहने तर वरून मेट्रो धावेल,’ असे भिमाले यांनी सांगितले.

Web Title : मुंढवा-खराडी फ्लाईओवर स्वीकृत: यातायात सुगम, मेट्रो एकीकृत

Web Summary : पुणे के मुंढवा-खराडी मार्ग पर महात्मा फुले चौक पर 126 करोड़ का फ्लाईओवर बनेगा। इस परियोजना का उद्देश्य मुंढवा, केशवनगर और खराडी में यातायात को सुव्यवस्थित करना है। यह प्रस्तावित मगरपट्टा-खराडी मेट्रो लाइन को भी एकीकृत करेगा, जिससे दो मंजिला ढांचा बनेगा।

Web Title : Mundhwa-Kharadi Flyover Approved: Easing Traffic, Integrating Metro

Web Summary : Pune's Mundhwa-Kharadi road will get a 126-crore flyover at Mahatma Phule Chowk. This project aims to streamline traffic in Mundhwa, Keshavnagar, and Kharadi. It will also integrate the proposed Magarpatta-Kharadi metro line, creating a double-decker structure.