पन्नास वर्षीय महिलेवर सलग तीन वर्ष बलात्कार; कोथरूडच्या CA ला बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 12:34 PM2022-11-27T12:34:51+5:302022-11-27T12:35:04+5:30

येरवडा पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल

A fifty year old woman was raped for three consecutive years Chains to CA of Kothrud | पन्नास वर्षीय महिलेवर सलग तीन वर्ष बलात्कार; कोथरूडच्या CA ला बेड्या

पन्नास वर्षीय महिलेवर सलग तीन वर्ष बलात्कार; कोथरूडच्या CA ला बेड्या

googlenewsNext

पुणे प्रतिनिधी/किरण शिंदे : कार्यालयात काम करणाऱ्या 50 वर्षीय महिलेला ब्लॅकमेल करत सलग तीन वर्ष तिच्यावर बलात्कार करणाऱ्या कोथरूडमधील एका सीएला पोलिसांनीअटक केली. येरवडा पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2019 ते 2022 या कालावधीत हा सर्व प्रकार घडला. याप्रकरणी एका 50 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिरुद्ध सतीश शेठ (वय 42, कांचनगंगा होम्स, डहाणूकर कॉलनी, कोथरूड) हा सी ए आहे. कोथरूड परिसरात त्याचे ऑफिस आहे. फिर्यादी महिला त्याच्या ऑफिसमध्ये  नोकरी करत होती. त्यामुळे दोघांची चांगली ओळख होती. 

मार्च 2019 मध्ये अनिरुद्ध शेठ यांनी फिर्यादी महिलेला क्लाइंटला फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याने भुगाव येथे नेले. भुगाव येथील फ्लॅटवर गेल्यानंतर आरोपीने पेस्ट्रीमध्ये गुंगीचे औषध देऊन फिर्यादी सोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. या सर्व घटनेचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करून नंतर तो व्हायरल करण्याची धमकी देऊन फिर्यादी सोबत वारंवार जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. मुंबई पुणे आणि अलिबाग येथील हॉटेलमध्ये आणि येरवड्यातील महाराष्ट्र हाऊसिंग कॉलनीत वेळोवेळी हा प्रकार घडला. 

दरम्यान काही दिवसांपूर्वी अनिरुद्ध शेठ याने या महिलेसोबत पुन्हा जबरदस्ती करत याविषयी कोणाला सांगितल्यास फिर्यादीला आणि तिच्या मुलीला मारून टाकण्याची धमकी दिली आहे. या सर्व प्रकारानंतर पीडित महिलेने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. येरवडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास सुरू आहे. 

Web Title: A fifty year old woman was raped for three consecutive years Chains to CA of Kothrud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.