Video: शेतकरी बापाची हौस; मुलीला १ चारचाकी अन् २ दुचाकी भेट, मुलीची बुलेटवर थेट लग्न मंडपात एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 18:26 IST2023-05-09T18:25:46+5:302023-05-09T18:26:52+5:30

मुलीला शेतात चालवल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरसह सर्व वाहने चालवता येत असल्याने तिच्या वडिलांनी ३ गाड्या लग्नात दिल्या भेट

A farmer father enthusiasm Gift of 1 four wheeler and 2 two wheeler to the girl, direct entry of the girl to the marriage hall on bullet | Video: शेतकरी बापाची हौस; मुलीला १ चारचाकी अन् २ दुचाकी भेट, मुलीची बुलेटवर थेट लग्न मंडपात एंट्री

Video: शेतकरी बापाची हौस; मुलीला १ चारचाकी अन् २ दुचाकी भेट, मुलीची बुलेटवर थेट लग्न मंडपात एंट्री

तळेगाव ढमढेरे : आजच्या आधुनिक युगात महिलांना पुरुषांच्या बरोबरीने मान देण्यात आला आहे. तसेच ज्या घरात मुलगी जन्माला आली. त्या घरात तिचे स्वागत केले जात आहे. बाप आणि मुलीचे नाते विशेष मानले जाते. आज लग्न सोहळ्या दरम्यान मुलगा आणि मुलीने थेट घोड्या ऐवजी बुलेट वरून लग्न मंडपात एंट्री केली. ती देखील नवरी मुलीने बुलेट गाडी चालवत आणल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. याची चर्चा आता सुरू झाली आहे.

हवेली तालुक्यातील सांगवी सांडस या ठिकाणी एका शेतकरी बापाने आपल्या मुलीच्या लग्नात भेट म्हणून एक चार चाकी, एक बुलेट आणि एक दुचाकी भेट दिली आहे. त्यामुळे या भागात या लग्नाची विशेष चर्चा आहे. सांगवी सांडस (ता.हवेली) येथील तुकाराम मारुती शितोळे यांच्या मुलीचा लग्न सोहळा शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे पार पडणार आहे.

टाकळी भीमा येथील दत्तात्रय बबनराव धुमाळ यांच्या मुलाशी संपन्न झाला. मुलीने बुलेटवर नवऱ्याला पाठीमागे बसवून लग्न मंडपात ग्रँड एंट्री केली आहे. मुलीला सर्व वाहने चालवता येतात. त्यामुळे तिने आणि तिच्या पतीने लग्नात वेगळ काही तरी करावं यासाठी त्यांनी थेट लग्न मंडपात बुलेट वरून एंट्री केली आहे.शिवाय बुलेट नवरी मुलगी चालवत होती.त्यामुळे याची विशेष चर्चा सुरू झाली आहे.

त्यामुळे हा लग्न सोहळा सर्वांचे आकर्षण ठरला आहे. मुलीला शेतात चालवल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरसह सर्व वाहने चालवता येत असल्याने तिच्या वडिलांनी तिला लग्नात भेट म्हणून एक चार चाकी,एक बुलेट आणि एक दुचाकी अशा तीन गाड्या दिल्या आहेत. शेतकरी बापाने आपल्या मुलीच्या लग्नाची हौस पूर्ण केली असून मुलगी आणि बापाच्या नात्याला यामुळे एक वेगळे स्थान निर्माण झाले आहे. या लग्न सोहळ्याची पंच क्रोशीसह शिरूर तालुक्यात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.

Web Title: A farmer father enthusiasm Gift of 1 four wheeler and 2 two wheeler to the girl, direct entry of the girl to the marriage hall on bullet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.