Accident: वेल्हे तालुक्यात शेतकऱ्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 20:50 IST2022-11-08T20:50:25+5:302022-11-08T20:50:56+5:30

वेल्हे पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल

A farmer died after being hit by an unknown vehicle in Velhe taluka | Accident: वेल्हे तालुक्यात शेतकऱ्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू

Accident: वेल्हे तालुक्यात शेतकऱ्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू

मार्गासनी : वाजेघर बुद्रुक येथे खाटपेवाडी (ता.वेल्हे) येथील शेतकऱ्याचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मुत्यु झाला. दिपक धोंडीबा खाटपे (वय ३७,खाटपेवाडी,पाल बुद्रुक,ता.वेल्हे) असे शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना काल सोमवारी (ता.७) रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. आज पहाटे वेल्हे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली. 

 दिपक हा पायी चालत वाजेघर बुद्रुक येथून खाटपेवाडी येथे चालला होता. त्यावेळी अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. त्यात दिपक हा गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी वेल्ह्याच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वी दीपकचा मृत्यू झाला असल्याचे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी जगदेव कुरंकार यांनी सांगितले. याप्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी वेल्हे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. काही वाहनचालकांकडे चौकशी पोलीस करत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली असुन मात्र अद्यापही वाहनाचा शोध पोलिसांना लागला नाही. 

Web Title: A farmer died after being hit by an unknown vehicle in Velhe taluka