वरवंड : दौंड तालुक्यातील पडवी येथे बारामती शहरात झालेला अपघाताची पुनरावृत्ती पहावयास मिळाली आहे. ओव्हरलोड खडीने भरलेल्या डंपरने एका दुचाकीला उडवले अक्षरशा खडीने भरलेला हा डंपर त्या व्यक्तीच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. पडवी पाटी येथे शुक्रवार सकाळी 10 ते 11 दरम्यान कुसेगाव दिशेने खड्डी भरून येणाऱ्या डम्पर ने सुपे बाजू कडून येणाऱ्या दुचाकी स्वराला उडवल्याने त्या दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कळताच पाटस पोलीस ते कर्मचारी उपस्थित होते . या अपघातामध्ये गबाजी भिमाजी कोळपे (वय वर्ष 55 रा. वाई ,सोमजाई नगर, सातारा) या दुचाकी स्वाराचा अपघातात जागीच मृत्यू झाला. तसेच त्यांच्याबरोबर असणारे अलका गबाजी कोळपे या जखमी झाल्या आहेत. मात्र घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणे गरजेचे होते. तसेच महसूल विभागाला प्रशासन नागरिकांनी फोन करून कल्पना दिली असता महसुली विभागाचं वरातीमागून घोडे हे प्रत्यय पहावयास मिळाला. घटनेच्या ठिकाणी खडीने भरलेला डम्पर (हायवा) हा पोलिसांनी घेऊन गेल्यानंतर महसूल विभागाचे काही कर्मचारी उपस्थित राहिले. या घटनेचे गांभीर्य अद्यापही महसूल विभागाला नसल्याने नागरिकांमधून महसूल विभागाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. ही घटना इतकी भयानक होती की संबंधित व्यक्तीचा काय अवस्था झाली असेल हे या शब्दात मांडता येत नाही. या अवस्थेला पोलीस प्रशासन व महसूल विभाग असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. पडवी राजरोसपणे मोठ्या प्रमाणात होत असलेल्या मुरुम उपशावर महसूल विभागाचे अधिकारी गप्प का असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. तहसीलदार यांच्याकडे नागरिकांनी फोनवर व प्रत्यक्ष भेटून वारंवारता करावी करू नये तहसीलदार यांनी कोणतीच कारवाई केली नसल्याचे यावेळी नागरिकांमधून बोलले जात होते . महसूल विभागावर कारवाई करू नका असा कोणाचा राजकीय दबाव होता का असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे. पडवी येथे परिसरात राजरोसपणे चाललेल्या मुरूम उपसा व अवैध खडी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई होणार का असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
खडीने भरलेल्या डंपरने दुचाकीला उडवले; अंगावरून गेल्याने जागीच मृत्यू, दौंडमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 11:59 IST