कादवे खिंडीवरिल रस्त्यात दरड कोसळली; वेल्हे पानशेत रस्ता बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 12:47 IST2024-08-13T12:47:18+5:302024-08-13T12:47:43+5:30

पुण्यापासून जवळ अंतर असल्याने या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते, दरड कोसळल्याने हा रस्ता बंद झाला असून नागरिकांची गैरसोय होत आहे

A crack fell in the road at Kadwe Khindi Welhe Panshet road closed | कादवे खिंडीवरिल रस्त्यात दरड कोसळली; वेल्हे पानशेत रस्ता बंद

कादवे खिंडीवरिल रस्त्यात दरड कोसळली; वेल्हे पानशेत रस्ता बंद

वेल्हे : वेल्हे ते पानशेत रस्त्यावर असलेल्या कादवे खिंडीवरिल रस्त्यात दरड कोसळली असून वेल्हे ते पानशेत रस्ता बंद झाला आहे, राजगड तालुक्यातील वेल्हे ते पानशेत त जोडणारा रस्ता असून या रस्त्यावर कादवे खिंडीच्या जवळ पावसामुळे दरड कोसळली असून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झालेला आहे. 

राजगड तालुक्याचा भौगोलिक दृष्ट्या दोन विभाग पडतात पानशेत व वेल्हे असे दोन विभाग असून शासकीय कामासाठी पानशेत परसरांतील रुळे कादवे कुरण, घोल, दापसरे, आंबेगाव, शिरकोली, निगडे मोसे, आधी गावातील ग्रामस्थ वेल्हे या ठिकाणी येत असतात. तालुक्यातील सर्व शासकीय मुख्य कार्यालय वेल्हे या ठिकाणी येत असल्याने शासकीय कामांसाठी पानशेत परिसरातील लोकांना या रस्त्यावरून जावे लागते. तसेच पुण्यापासून जवळ अंतर असल्याने या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते दरड कोसळल्याने हा रस्ता बंद झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. याबाबत तहसीलदार निवास ढाणे म्हणाले की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून लवकरच हा रस्ता मोकळा केला जाईल. 

Web Title: A crack fell in the road at Kadwe Khindi Welhe Panshet road closed