पुण्यात येरवडा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत कंत्राटदारावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 11:32 AM2022-02-04T11:32:19+5:302022-02-04T12:14:09+5:30

गुन्हा दाखल करून तिघा जणांना ताब्यात घेतले असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती

A case has been registered against a contractor involved in the Yerawada slab collapse accident in Pune | पुण्यात येरवडा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत कंत्राटदारावर गुन्हा दाखल

पुण्यात येरवडा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत कंत्राटदारावर गुन्हा दाखल

Next

येरवडा : येरवड्यातील ब्लू ग्रास बिझनेस पार्क येथील बांधकाम साइटवर स्लॅप साठी तयार करण्यात आलेली जाळी गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास  मजुरांच्या अंगावर कोसळली. या दुर्घटनेत पाच मजूर जागीच ठार झाले तर इतर पाच जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी येरवडापोलिसांनी बांधकाम साइटवर सुरक्षेच्या योग्य उपाययोजना न करता मजुरांचा मृत्यूस गंभीर जखमी करण्यासाठी कारणीभूत म्हणून ब्लू ग्रास बिझनेस पार्क कंपनीसह अहलुवालिया कन्स्ट्रक्शन यांच्या वर सदोष मनुष्यवधाचा सह इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली. 

दरम्यान गुरुवारी रात्री वाडीया बंगला कल्याणीनगर आवारात घडलेल्या या दुर्घटनेच्या घटनास्थळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. याप्रकरणी दुर्घटनेतील जखमी मजूर मोहम्मद नाहीर (वय 21, रा. मुळगाव कटियार, बिहार, सध्या राहणार ब्लू ग्रास बिझनेस पार्क लेबर पार्क) याने दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या दुर्घटनेतील सर्व मृत व जखमी हे एकाच गावातील असून गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास बांधकाम साइटवर लोखंडी जाळी बसविण्याचे काम सुरू होते. या ठिकाणी दहा ते पंधरा मजूर काम करत होते. अचानक काम सुरू असताना लोखंडी जाळी खाली काम करणाऱ्या मजुरांच्या अंगावर कोसळली. दहा जण अडकले होते. या दुर्घटनेनंतर सुमारे दोन तास सुरू असलेल्या मदत कार्यानंतर दुर्घटनेत अडकलेल्या मृत व गंभीर जखमी मजुरांना बाहेर काढण्यात आले. यामधील तीन जखमींवर ससून रुग्णालयात तर दोन जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनास्थळी आमदार सुनील टिंगरे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांनी रात्री भेट दिली. हे सर्व मजूर बिहार येथील कटियार या गावातील असून मागील काही दिवसांपासून वाडीया बंगला येथील बांधकाम साइटवर मजुरीचे काम करत होते.

Web Title: A case has been registered against a contractor involved in the Yerawada slab collapse accident in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.