पुणे : पुणे-सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गातून निघालेल्या दुचाकीस्वाराने पीएमपी चालकाला मारहाण करून त्याच्या डोक्यात दगड घातल्याची घटना घडली. या प्रकरणी दुचाकीस्वाराविरोधात पर्वती पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सुरेश विठ्ठल गुंठे (वय ४०, रा. कात्रज गाव) असे जखमी झालेल्या पीएमपी चालकाचे नाव आहे.
या प्रकरणी दुचाकीस्वार मन्सूर गफूर शेख (वय २४, रा. झांबरे वस्ती, बिबवेवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गुंठे यांनी पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मीनारायण चित्रपटगृह परिसरातून पीएमपी बस बीआरटी मार्गातून १४ मार्च रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास निघाली होती. त्या वेळी दुचाकीस्वार मन्सूर शेख बीआरटी मार्गातून निघाला होता. दुचाकीस्वार शेखने किरकोळ वादातून दुचाकी पीएमपी बससमोर आडवी लावली. बीआरटी मार्गात दुचाकी लावून त्याने पीएमपी चालक गुंठे यांना शिवीगाळ केली. त्यांना मारहाण करून डोक्यात दगड घातला. गुंठे यांचा मोबाइलदेखील फोडला. त्यांच्या गळ्यातील चांदीची साखळी तोडून नुकसान केले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जगताप करत आहेत.
Web Summary : Pune: A PMP driver was attacked with a stone after a road argument. The biker blocked the bus, verbally abused, assaulted the driver, and damaged his mobile and chain. Police have filed a case against the biker, Mansoor Sheikh.
Web Summary : पुणे: सड़क पर बहस के बाद एक पीएमपी ड्राइवर पर पत्थर से हमला किया गया। बाइकर ने बस को रोका, गाली-गलौज की, ड्राइवर पर हमला किया और उसका मोबाइल और चेन तोड़ दी। पुलिस ने बाइकर मंसूर शेख के खिलाफ मामला दर्ज किया है।