Swargate: 'बस तिकडे लागलीये, चल मी तुला घेऊन जातो', स्वारगेट स्थानकात तरुणीसोबत काय घडलं? Inside Story
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 14:13 IST2025-02-26T14:10:48+5:302025-02-26T14:13:42+5:30
Pune Rape Case: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये एका तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्याची आल्याची घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली.

Swargate: 'बस तिकडे लागलीये, चल मी तुला घेऊन जातो', स्वारगेट स्थानकात तरुणीसोबत काय घडलं? Inside Story
Swargate Rape Case: फलटणला जाण्यासाठी ती स्वारगेट बस स्थानकात आली. जिथे नेहमी गाडी लागते, त्या फलाटावरील खुर्चीवर ती बसली होती. आरोपी तिच्या जवळ आला. गोड बोलत ओळख करून घेतली आणि नंतर तिकडे बस लागलेली आहे म्हणत शिवशाही बस मध्ये नेऊन बलात्कार केला. हादरवून टाकणारी ही घटना पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात घडलीये. आरोपीचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणाबद्दल पोलिसांनी सविस्तर माहिती दिलीये.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
स्वारगेट बस स्थानकात झालेल्या बलात्कार प्रकरणाची पुणे पोलिसांकडून माहिती देण्यात आली. आरोपीने आधी तरुणीचा विश्वास संपादन केला आणि नंतर तिला बस मध्ये नेऊन अत्याचार केला, असे पोलिसांनी सांगितले.
आधी आरोपी तरुणीच्या बाजूला जाऊन बसला
"ही मुलगी पुण्यात कामाला आहे. ती इथून फलटणला गावी चालली होती. सकाळी साडेपाच पावणे सहा दरम्यान ही घटना घडली आहे. ती स्वारगेट बसस्थानकात बसची वाट बघत थांबली होती. त्यावेळी आरोपी तिच्याजवळ गेला. आधी आरोपी तिच्या आजूबाजूला फिरताना सीसीटीव्हीमध्ये दिसतो.
नंतर तिच्या शेजारी जाऊन बसला. दोघांचं बोलणं सुरू असताना बाजूला असलेला एक माणूस उठून जातो. आरोपीने गोड बोलून तिच्याशी ओळख करून घेतली.
तरुणीला म्हणाला, सातारची बस इथे लागत नाही, तिकेड लागलीये
कुठे चाललीये ताई, असे आरोपीने तिला विचारले. मुलगी म्हणाली मला फलटणला जायचं आहे. तर आरोपी म्हणाला की, सातारची बस ती इथे लागत नाही. ती तिकडे लागलेली आहे. त्यावर मुलगी त्याला म्हणाली की, नाही. बस इथेच लागते. म्हणून मी इथे बसलीये.
त्यावर आरोपी मुलीला म्हणाला की, बस तिकडे लागलीये. चल मी तुला तिकडे घेऊन जातो. त्यानंतर मुलगी त्याच्याबरोबर जाते. तिथे गेल्यानंतर बसमध्ये अंधार होता. अंधार पाहून आरोपीला विचारले की, बसमध्ये अंधार आहे. त्यावर आरोपी म्हणाला की, ही रात्री उशिराची बस आहे आणि लोक झोपलेले आहेत. त्यामुळे लाईट बंद आहेत. तू वरती चढून टॉर्च लावून चेक करू शकते.
तरुण बसमध्ये चढली अन् आरोपीने केला बलात्कार
ती बसमध्ये गेली आणि टॉर्च लावायला गेली. त्यावेळी आरोपी मागून चढला आणि दरवाजा लावून घेतला. त्यानंतर आरोपीने तिच्यावर अत्याचार केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.