राजगुरूनगर: राजगुरुनगर शहरात एक धक्कादायक घटना घडली. दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यावर त्याच वर्गातील दुसऱ्या विद्यार्थ्याने चाकूने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेला पुष्कर दिलीप शिंगाडे विद्यार्थी जागीच मृत पावला असल्याची माहिती खेडपोलिसांनी दिली.
शहरातील गजबजलेल्या वाडा रस्त्या नजीकच्या पाण्याच्या टाकी जवळ खासगी क्लास मध्ये सोमवारी (दि. १५) सकाळी ही घटना घडली. दोन्ही विद्यार्थी एकाच शाळेत शिकत आहेत. किरकोळ वादातून हा प्रकार घडला असावा, असे प्राथमिक माहितीतून समोर येत आहे. हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्याने चाकूने सपासप वार केले, ज्यामुळे जखमी पुष्करला गंभीर इजा झाल्या. घटनेची माहिती मिळताच राजगुरुनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हल्ला करणारा विद्यार्थी आणि त्याच्या साथीदाराने स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली. दोन्ही अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुष्करला तातडीने चांडोली रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. नातेवाईकांनी दवाखान्यासमोर गर्दी केली आहे.
Web Summary : In Rajgurunagar, Pune, a tenth-grade student, Pushkar Shingade, died after being stabbed by a classmate following a minor argument at a private class. The attacker and an accomplice surrendered to police. Both are in custody.
Web Summary : पुणे के राजगुरुनगर में एक निजी कक्षा में मामूली विवाद के बाद एक सहपाठी द्वारा चाकू मारने से दसवीं कक्षा के छात्र पुष्कर शिंगाडे की मौत हो गई। हमलावर और एक साथी ने पुलिस के सामने आत्मसमर्पण कर दिया। दोनों हिरासत में हैं।