शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
2
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
3
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

पुणे - नाशिक महामार्गावर महावितरण विरोधात जुन्नरमधील ९० सरपंचांचे रास्ता रोको आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 6:21 PM

राज्य शासनाने पूर्वीप्रमाणे पाणीपुरवठा व स्ट्रीट लाईट बिले भरावीत अशी मागणी

ठळक मुद्देरास्ता रोको आंदोलन करणाऱ्या ४० जणावर नारायणगाव पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई

नारायणगाव:  जुन्नर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या स्ट्रीट लाईट कनेक्शन खंडित करण्यास महावितरण कंपनीकडून सुरुवात केली आहे. हे वीज बिल ग्रामपंचायतीने भरावे असे शासनाकाडून आदेश देण्यात आले होते. परंतु ग्रामपंचायतीला हे शकय होत नसल्याच्या निषेर्धात जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांच्या नेतृत्वाखाली जुन्नर तालुक्यातील ९० सरपंचानी तीव्र संताप व्यक्त करीत नारायणगाव येथील पुणे – नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले .

दरम्यान , पुणे – नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या ४० जणावर नारायणगाव पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली .

महावितरण कंपनीने ग्रामपंचायतीना थकबाकीच्या नोटिसा जारी करून स्ट्रीट लाईट कनेक्शन खंडित करण्यास सुरुवात केली आहे . वीज वितरण अधिकाऱ्यांनी हि कारवाई थांबबावी यासाठी जुन्नर तालुका सरपंच परिषदेच्या वतीने ९० ग्रामपंचायतीच्या सरपंच यांनी नारायणगाव येथे रास्ता रोको करून महावितरण कंपनीचे नारायणगाव विभागाचे उपकार्यकारी अभियंता सिद्धार्थ सोनवणे यांना निवेदन दिले . यावेळी पंचायत समिती सदस्य गावातील सरपंच , उपसरपंच ,सदस्य उपस्थित होते .

बुचके म्हणाल्या, सर्व ग्रामपंचायतीचे वीज बील १९६५ पासून महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हा परिषद अदा करीत आहे. गेल्या दोन वर्षापासुन स्ट्रीट लाईटचे बील हे ग्रामपंचायतीने भरावे. असे शासनाने जिल्हा परिषदेला आदेश दिले आहेत. ग्रामपंचायतीला नागरिकांस पथदिवे बसवून सोई - सुविधा देणे बंधनकारक आहे. परंतु सध्या कोरोनाच्या संकटामुळे ग्रामस्थ आधीच त्रस्त आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कर भरणा हे ग्रामस्थांना शक्य होत नाही. सध्या राज्यशासनाने १५ वा वित्त आयोग अंतर्गत ही  बिले भरण्याचे आदेश काढलेला आहे. परंतु १५ वा वित्त आयोग हा केंद्र सरकार अंतर्गत येत असून  निधीतील  खर्च करण्यासाठी केंद्र शासनाने बंधित व अबंधित असा आदेश दिलेला असून त्याप्रमाणे ग्रामपंचायतीने हा  निधी खर्च करण्यासाठी  आराखडे मंजूर देखील केलेले आहे. तसेच १५ वा वित्त आयोग अंतर्गत पाणी पुरवठा व स्ट्रीट लाईट बिल भरणेकामी केंद्र सरकारने  कुठलाही आदेश दिलेला नाही. त्यामुळे राज्य शासनाने पूर्वीप्रमाणे पाणीपुरवठा व स्ट्रीट लाईट बिले भरावीत अशी मागणी बुचके यांनी केली .

टॅग्स :PuneपुणेJunnarजुन्नरelectricityवीजmahavitaranमहावितरणGovernmentसरकारMaharashtraमहाराष्ट्र