खेळताना खांबाला स्पर्श; विजेच्या धक्क्याने ८ वर्षांच्या शाळकरी मुलीचा मृत्यू, पुण्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 19:16 IST2025-06-03T10:27:06+5:302025-06-03T19:16:46+5:30

आणखी एक मुलाचा खांबाला स्पर्श झाला, एका बसचालकाने तत्परता दाखवून दोघांना लाकडी बांबूने ढकलले, परंतु मुलीचा मृत्यू झाला

8 year old schoolgirl dies of electric shock after touching pole while playing, shocking incident in Pune | खेळताना खांबाला स्पर्श; विजेच्या धक्क्याने ८ वर्षांच्या शाळकरी मुलीचा मृत्यू, पुण्यातील धक्कादायक घटना

खेळताना खांबाला स्पर्श; विजेच्या धक्क्याने ८ वर्षांच्या शाळकरी मुलीचा मृत्यू, पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे : खेळत असताना विजेच्या धक्क्याने आठ वर्षांच्या शाळकरी मुलीचा मृत्यू झाला. ही घटना नाना पेठेत रविवारी घडली. या दुर्घटनेत आणखी एक मुलगा जखमी झाला असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. सायली डंबे (वय ८, रा. डोके तालीमजवळ, नाना पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. 

सायली डंबे आणि मुले रविवारी दुपारी नाना पेठेतील डोके तालीम परिसरात खेळत होते. त्यावेळी इनामदार चौकातील एका खांबाला सायलीचा स्पर्श झाला. या खांबात विद्युत प्रवाह उतरला होता. सायली आणि तिच्याबरोबर असलेला एक मुलाला विजेचा धक्का बसला. हा प्रकार तेथून निघालेल्या एका बसचालकाने पाहिला. त्याने तत्परता दाखवून दोघांना लाकडी बांबूने ढकलले, अशी माहिती या भागातील नागरिकांनी दिली. दोघांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल उपचार करण्यात आले. उपचारांदरम्यान सायलीचा मृत्यू झाला. ही घटना उघडकीस आल्यानंतर नाना पेठ परिसरात शोककळा पसरली. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात ‘अकस्मात मृत्यू’ अशी नोंद करण्यात आली आहे.

शाळकरी मुलीचा विजेचा धक्क्याने मृ्त्यूप्रकरणी महावितरण आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. दुर्घटना नेमकी कशी घडली. याबाबतचा अहवाल ‘महावितरण’कडून आल्यानंतर चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गित्ते यांनी सांगितले.

Web Title: 8 year old schoolgirl dies of electric shock after touching pole while playing, shocking incident in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.