शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
2
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
3
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
4
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
5
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
6
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
7
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
8
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
9
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
10
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
11
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
12
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
13
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
14
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
15
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
16
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
17
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
18
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
19
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
20
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट

राज्यात ७.५ हजार हे. शेतीची झाली माती; सर्वाधिक फटका जळगाव जिल्ह्याला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 6:22 AM

राज्यात ९ एप्रिलपासून अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपून काढले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: सलग सहाव्या दिवशी शनिवारीही अवकाळी पावसाने झोडपून काढले. विदर्भात मंगळवार ते गुरुवार या तीन दिवसांत तब्बल साडेसात हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला. सर्वाधिक चार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान एकट्याजळगाव जिल्ह्याला झाल्याचा अंदाज आहे. रविवारीही विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.  

राज्यात ९ एप्रिलपासून अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपून काढले आहे. प्राथमिक अंदाजानुसार राज्यात ७ हजार ४८९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान शनिवारी पहाटेही मराठवाडा, विदर्भासह जळगाव आणि सोलापूर जिल्ह्यात पाऊस झाला.

सात राज्यांत गारपिटीचा हवामान विभागाचा इशारा- हवामान विभागाने जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा, राजस्थान व मध्य प्रदेशसह महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा दिला आहे. मध्य प्रदेशातील १३ जिल्ह्यांत येत्या काही तासांत गारपिटीची शक्यता आहे.- स्कायमेट या हवामान संस्थेने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा दिला आहे.- तसेच उत्तर प्रदेश, हरयाणा, राजस्थान, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा व अंदमान-निकोबारमध्ये पावसाची तर जम्मू-काश्मीर आणि हिमाचलमध्ये हलक्या बर्फवृष्टीची शक्यताही वर्तविली आहे.- इराण आणि पाकिस्तानमार्गे उत्तर भारतात पोहोचणाऱ्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामान बदलल्याने १५ एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता आहे.

कुठे किती नुकसान ?जिल्हा    हेक्टर  जळगाव    ३,९८४बीड    १,०२० नांदेड    ७४८वर्धा    ५२७धाराशिव    ३०८हिंगोली    २९७छ. संभाजीनगर    १६३लातूर    १६०.२जालना    १३३.३

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीRainपाऊस