शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
हरभजन सिंगविरोधात समर्थकांचा रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
4
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
7
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
8
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
9
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
10
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
11
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
12
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
13
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
14
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
15
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
16
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
17
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
18
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
19
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
20
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
Daily Top 2Weekly Top 5

उरुळी कांचन येथे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ६६ टक्के मतदान; ५५ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 19:55 IST

उरुळी कांचन ग्रामपंचायतीसाठी एकूण सहा प्रभागांमध्ये १७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती.

उरुळीकांचन : उरुळी कांचन व परिसरातील ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी ( दि. १५) मतदान झाले. सकाळी साडे सात ते साडे अकरा या वेळात २१ टक्के तर दीड वाजण्याच्या दरम्यान ४१ टक्के आणि साडे तीनच्या दरम्यान ५३ टक्केचा टप्पा ओलांडला होता. साडेपाच वाजता एकूण २५ हजार ४२७ मतदारांपैकी १६ हजार ८११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने ६६ .११ टक्के मतदान नोंदवले गेले.

उरुळी कांचन ग्रामपंचायतीसाठी एकूण सहा प्रभागांमध्ये १७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. पैकी प्रभाग क्रमांक चार मधून एक महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्यामुळे १६ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया प्रशासनाकडून राबवण्यात आली, यासाठी सुमारे ५५ जण आपले नशीब आजमावत होते, त्यांनी साम - दाम - दंड - भेद अशा सगळ्या प्रकाराने मतदारांशी संपर्क साधून मतदानात सहभागी होण्यासाठी जोराचा प्रचार व प्रयत्न केला होता. मात्र, आज या ५५ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रामध्ये बंद झाले असून ते १८ तारखेलाच उघड होऊन जनतेपुढे येईल. प्रत्येक प्रभागात उमेदवारांनी स्वतंत्र आघाड्या अथवा युती करून निवडणुका लढवल्या होत्या. मागच्या निवडणुकीचे एकमेकांचे प्रतिस्पर्धी या निवडणुकीत एकत्र येऊन निवडणूक लढवत होते. त्यामुळे या निवडणुकीत नेमके काय होणार याची उत्सुकता सर्वसामान्य जनतेला लागून राहिली आहे.

विशेष म्हणजे या मतदान प्रक्रियेत वय वर्ष शंभरच्या श्रीमती रंभाबाई मारुती कांचन यांनी सहभाग घेऊन आपले मत नोंदवले.दोन अल्पवयीन मुलांकडून मतदान करून घेण्यासाठी प्रवृत्त केल्याचा प्रकार मतदान प्रक्रियेदरम्यान आढळून आला. परंतु मतदान प्रतिनिधीच्या द्वारे या दोघांनाही मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यास मज्जाव केल्याने काही काळ वातावरण तंग झाले होते. निवडणुक निर्णय अधिकारी व पोलिसांनी या प्रकाराची नोंद घेत खातरजमा करून या अल्पवयीन मुलांना त्यांची माहिती जमा करून घेऊन सोडून दिले.मतदान प्रक्रिया सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत पोलीस यंत्रणेने म्हणजे  ६ अधिकारी ४५ पोलिस कर्मचारी व एस आर पी एफ चे जवान यांच्या माध्यमातून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता, कोणताही अनुचित प्रकार घडला नसून शांततेत मतदान पार पडले. शिंदवणे येथे 85 .54%, वळती येथे 85 टक्के, सोरतापवाडी येथे 75%, भवरापूर 90% असे परिसरातील ग्रामपंचायतीत मतदान झाले.

टॅग्स :uruli kanchanउरुळी कांचनElectionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायतVotingमतदान