शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
4
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
5
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
6
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
7
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
8
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
9
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
10
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
11
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
12
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
13
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
14
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
15
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
16
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
17
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

देशातील ६० टक्के शेतीला पाणी नाही - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 23:51 IST

देशात ८२ टक्के शेतकऱ्यांचे क्षेत्र २ हेक्टरपेक्षा कमी आहे. त्यातील ६० टक्के शेतीला खात्रीचे पाणी नाही. त्यामुळे केवळ शेतीचा व्यवसाय करणे संपूर्ण कुटुंबासाठी योग्य नाही.

बारामती - देशात ८२ टक्के शेतकऱ्यांचे क्षेत्र २ हेक्टरपेक्षा कमी आहे. त्यातील ६० टक्के शेतीला खात्रीचे पाणी नाही. त्यामुळे केवळ शेतीचा व्यवसाय करणे संपूर्ण कुटुंबासाठी योग्य नाही. शेतीचे क्षेत्र वाढत नाही. शेतीच्या वाटण्या होत आहेत. परिणामी शेतीचे क्षेत्र कमी होत असून कुटुंब मात्र वाढत आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.माळेगाव बु. (ता. बारामती) येथील ‘व्हीएनएस निर्माण तावरे सिटी’ या प्रकल्पाचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात पवार बोलत होते. पवार म्हणाले, की आपण कृषिमंत्री असताना यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतक-याने आत्महत्या केली होती. त्या रात्री आपल्याला झोप लागली नाही. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासमवेत त्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची भेट घेतली. त्या ‘माऊली’ने डोळ्यात पाणी आणून सांगितले. शेतकºयाच्या डोक्यावर कर्ज होतं. त्या कर्जाची परतफेड करता आली नाही. कर्जातील काही भाग मुलीच्या लग्नासाठी काढून ठेवला होता. लग्नाला विलंब झाला. कर्जाचे व्याज वाढत गेले. त्यामुळे बँकेची नोटीस आली. लिलाव झाला तर लग्नही रद्द होईल. या भीतीपोटी यवतमाळच्या शेतकºयानं आत्महत्या केल्याचं त्यांच्या पत्नीनं सांगितलं. देशाच्या उद्योगपतींना कर्जमाफी मिळू शकते, मग शेतक-यांना का नाही. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला,हे चित्र बदलायचे आहे. त्यामुळे निर्णय घेणे आवश्यक असल्याचे पंतप्रधानांना सांगितले. त्यानंतर तातडीने ७१ हजार कोटींच्या कर्जमाफीसह कर्जावरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला.या वेळी अ‍ॅड. केशवराव जगताप यांनी निष्क्रीय शासनामुळे शेतकºयांच्या पदरी निराशा आल्याची टीका केली. तसेच, अ‍ॅड. राहुल तावरे, संतोष वायचळ यांनी प्रास्ताविक केले. सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, तसेच स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील कलाकार शंतनू मोघे, आश्विनी महांगडे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी ज्येष्ठ नेते पवार यांच्या हस्ते पुणे शहरातील ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड जे. पी. धायतडक, कलाकार शंतनु मोघे यांच्यासह विविध पदाधिकारी कलाकारांचा सन्मान करण्यात आला.‘व्हीएनएस निर्माण तावरे सिटी’च्या वतीने अशोकराव तावरे, अ‍ॅड. केशवराव जगताप, प्रकाश चव्हाण, शंकर तावरे, अनिल तावरे, सचिन भोसले, दिलीप तावरे, कल्याण पांचागणे, अ‍ॅड. राहुल तावरे यांनी स्वागत केले. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते, कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पवार, सभापती संजय भोसले, बाळासाहेब तावरे, रोहिणी तावरे, अभिनेत्री स्नेहलता तावरे, शहाजी काकडे, छोटा पुढारी घनश्याम दरोडे आदी उपस्थित होते....तेवढेदेखील पैसे शेतक-यांना दिले नाहीदेशाच्या अर्थसंकल्पाने शेतक-यांसाठी वार्षिक ६ हजार रुपये जाहीर केले आहेत. त्यामुळे चहाच्या कपाला जेवढे पैसे मिळतात, तेवढेदेखील पैसे शेतकºयांना दिले नाही. असली दया आम्हाला नको. शेतीमालाला, शेतकºयांच्या घामाला भाव द्या. शेतकरी लाचारीने वागणार नाही, अशा शब्दांत अर्थसंकल्पात शेतकºयांसाठी जाहीर केलेल्या निर्णयावर माजी कें द्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी टीका केली....त्यांना देशातील ८० टक्के खाणा-यांची काळजी आहेदेशातील साखरेसाठी जाहीर केलेला २९०० रुपये भाव पडणारा नाही. त्यामुळे उसाला चांगली किंमत देता येत नाही. किमान ३२०० ते ३३०० दर साखरेला मिळाल्यास शेतकºयांना उसाला चांगली किंंमत देता येईल.कमीत कमी शेतकºयांना ३ ते ३५०० टन शेतकºयांना मिळल्याशिवाय शेतकºयाला ऊर्जितावस्था येणार नाही. मात्र, राज्यकर्त्यांना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २० टक्के उत्पादकांपेक्षा देशातील ८० टक्के खाणा-यांची काळजी आहे.त्यामुळे साखरेच्या किंमती वाढविण्याचा निर्णय होत नाही, अशी टीका माजी कें द्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारagricultureशेतीIndiaभारत