५ जणांकडून तरुणावर कोयत्याने वार, दगड डोक्यात घालून निर्घृण खून; सिंहगड कॉलेजजवळील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 17:02 IST2025-11-17T16:58:15+5:302025-11-17T17:02:13+5:30

५ हल्लेखोरांनी अचानक तरुणावर कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली, त्यानंतर त्यांनी त्यानंतर दगड घालून अत्यंत क्रूरपणे त्याचा खून केला

5 people brutally murdered a young man with a sickle, stoned him on the head; Shocking incident near Sinhagad College | ५ जणांकडून तरुणावर कोयत्याने वार, दगड डोक्यात घालून निर्घृण खून; सिंहगड कॉलेजजवळील धक्कादायक घटना

५ जणांकडून तरुणावर कोयत्याने वार, दगड डोक्यात घालून निर्घृण खून; सिंहगड कॉलेजजवळील धक्कादायक घटना

धायरी : सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथे एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास थरारणाऱी घटना घडली. ५ जणांच्या टोळक्याने २२ वर्षीय तरुणावर कोयत्याने सपासप वार करून आणि दगड घालून त्याचा निर्घृण खून केला. खुनाच्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.​ तौकीर शेख (वय २२, रा. धनकवडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. खून झालेला तौकीर शेख याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मिनाक्षीपुरम येथील कृष्णकुंज इमारतीच्या पार्किंगमध्ये तौकीर शेख हा बसलेला असताना, दुपारी अडीचच्या सुमारास ५ हल्लेखोर तिथे आले. ​या हल्लेखोरांनी अचानक तौकीरवर कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या तौकीरवर त्यांनी त्यानंतर दगड घालून अत्यंत क्रूरपणे त्याचा खून केला. घटना घडल्यानंतर सर्व हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही सुरू केली आहे. खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मात्र, पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या ५ हल्लेखोरांपैकी दोन आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. ​सिंहगड रस्ता पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. वैयक्तिक वैमनस्य, टोळीयुद्ध किंवा अन्य काही कारण आहे का, याचा पोलीस शोध घेत आहेत. पुढील तपास सुरू असून, आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.

Web Title : सिंहगढ़ कॉलेज के पास युवक की बेरहमी से हत्या; पांच संदिग्ध शामिल

Web Summary : सिंहगढ़ कॉलेज के पास वडगांव बुद्रुक में पांच हमलावरों ने 22 वर्षीय तौकीर शेख की बेरहमी से हत्या कर दी। आरोपियों ने दरांती और पत्थरों से हमला किया। पुलिस मामले की जांच कर रही है, शुरुआती रिपोर्टों से पता चलता है कि दो संदिग्ध नाबालिग हैं।

Web Title : Youth Brutally Murdered Near Sinhgad College; Five Suspects Involved

Web Summary : A 22-year-old man, Taukeer Sheikh, was brutally murdered near Sinhgad College by five assailants wielding sickles and stones. The attack occurred in a Wadgaon Budruk parking lot. Police are investigating the motive, with initial reports suggesting two suspects are minors.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.