पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने राज्यात घेण्यात येणारी इयत्ता बारावीची परीक्षा मंगळवारी (दि. १०) सुरू झाली. पहिल्याच पेपरमध्ये राज्यात ४२ प्रकरणे आढळून आली आहेत.
पहिलाच पेपर इंग्रजीचा असल्याने अनेकांना धाकधूक हाेती. त्याच वेळी काॅपीचे प्रकार घडतील, अशीही शंका उपस्थित केली जात हाेती. त्यामुळे राज्य दक्षता समिती, जिल्हा दक्षता समितींकडून आवश्यक उपाययाेजना करण्यात आल्या हाेत्या. या कडक तपासणीमुळे ४२ प्रकरणे समाेर आली आहेत. यामध्ये विभागनिहाय विचार करता पुणे विभाग - १०, नागपूर - ०१, छत्रपती संभाजीनगर - ०३, अमरावती - २२, नाशिक - ०४ आणि लातूर विभागात ०२ प्रकरणे सापडली आहेत. मुंबई, काेल्हापूर आणि कोकण विभाग निरंक आहे. राज्यात एकूण गैरमार्ग प्रकरणे ४२ झाली आहेत, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे सचिव डाॅ. दीपक माळी यांनी दिली. दरम्यान, राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी हे आयएएस प्रशिक्षणासाठी गेल्याने मंडळाचा प्रभारी कार्यभार राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डाॅ. नंदकुमार बेडसे यांच्याकडे साेपविण्यात आला आहे.
Web Summary : Maharashtra's HSC exams began with 42 cheating cases reported on the first English paper. Amravati division recorded the highest number (22), followed by Pune (10). Mumbai, Kolhapur, and Konkan reported zero cases. Nandkumar Bedse assumes charge as exam council head.
Web Summary : महाराष्ट्र HSC परीक्षा अंग्रेजी के पहले पेपर में 42 नकल मामलों के साथ शुरू हुई। अमरावती विभाग में सबसे अधिक (22) मामले दर्ज किए गए, इसके बाद पुणे (10) का स्थान रहा। मुंबई, कोल्हापुर और कोंकण में शून्य मामले दर्ज किए गए। नंदकुमार बेडसे ने परीक्षा परिषद के प्रमुख का कार्यभार संभाला।