Video: मद्यधुंद अवस्थेत चारचाकी चालवत ४ वाहने उडवली; संतप्त जमावाकडून त्या वाहनावर दगडफेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 12:45 IST2024-12-06T12:42:47+5:302024-12-06T12:45:07+5:30
१९ वर्षांच्या ऋतिकने सुस रोडवर मद्यधुंद अवस्थेत एका स्कुल बससहीत २, ३ वाहनांना धडक दिली

Video: मद्यधुंद अवस्थेत चारचाकी चालवत ४ वाहने उडवली; संतप्त जमावाकडून त्या वाहनावर दगडफेक
बाणेर: बाणेर येथील ननावरे उंडर पास सर्व्हिस रोडवर ड्रंक अँड ड्राइव्ह करत गुरुवारी ६.३०च्या सुमारास स्कूल बससह चार गाड्यांना ठोकले. संतप्त जमावाने पळून जाणाऱ्या वाहनावर दगडफेक केली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. बाणेर पोलिसांनी या वाहनाला आणि वाहनचालकाला ताब्यात घेतले आहे. त्याची मेडिकल टेस्टही करण्यात आली आहे.
ननावरे अंडर पास सर्व्हिस रोडवर चारचाकी चालक ऋतिक श्याम बनसोडे (वय १९, रा. रविशंकर ननावरे चौक, राहुल अर्कस, बिल्डिंग फ्लॅट) याने आपली चारचाकी स्कूल बसवर धडकवली आणि सरळ सूस पाषाण राेडकडे गेला. सुस रोडवर शिवशक्ती चौकात दुसऱ्या एका चारचाकीला धडक दिली. तसेच ननवरे चौकातील गॅरेजसमोरील गाड्यांना धडक देऊन गाड्यांचे नुकसान झाले. या गाडीचालकाने मद्य प्राशन केल्याचे निदर्शनास आले असून, बाणेर विभागातील ट्रॅफिक पोलिस निरीक्षक रजनी सरोदे यांनी घटनास्थळाला भेट देऊन वाहतूक सुरळीत केली. चालक ऋतिक श्याम बनसोडे (वय १९) यास बाणेर पोलिस स्टेशन येथे घेऊन जाऊन मेडिकलला पाठवले आहे. या अपघातात कोणीही जखमी नसून, पुढील तपास बाणेर पोलिस स्टेशन करीत आहे, अशी माहिती बाणेर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी दिली.