HSC/12th Exam: बारावीत हिंदी पेपरलाही काॅपीचे ४ प्रकार उघड; नागपूर आणि लातूर विभागात प्रत्येकी २ प्रकरणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 09:41 IST2026-02-12T09:41:07+5:302026-02-12T09:41:59+5:30

पुणे, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक आणि कोकण विभागात एकही प्रकरण आढळून आले नाही

4 types of copying revealed in 12th Hindi paper; Two cases each in Nagpur and Latur divisions | HSC/12th Exam: बारावीत हिंदी पेपरलाही काॅपीचे ४ प्रकार उघड; नागपूर आणि लातूर विभागात प्रत्येकी २ प्रकरणे

HSC/12th Exam: बारावीत हिंदी पेपरलाही काॅपीचे ४ प्रकार उघड; नागपूर आणि लातूर विभागात प्रत्येकी २ प्रकरणे

पुणे : राज्यात इयत्ता बारावीची परीक्षा सुरू आहे. याच्या पहिल्याच दिवशी अर्थात मंगळवारी (दि. १०) राज्यात काॅपीची ४२ प्रकरणे आढळून आली हाेती. दुसऱ्या दिवशीही चार प्रकरणे उघड झाली आहेत, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने परिपत्रकाद्वारे दिली आहे. पहिला पेपर इंग्रजीचा, तर दुसरा पेपर हिंदीचा हाेता. आज, गुरुवारी भाषेचा पेपर आहे.

विद्यार्थ्यांना काॅपीमुक्त आणि तणावमुक्त पेपर देता यावा म्हणून राज्य दक्षता समिती, जिल्हा दक्षता समितीने आवश्यक उपाययाेजना केल्या आहेत. या कडक तपासणीमुळे पहिल्या दिवशी ४२ प्रकरणे आणि दुसऱ्या दिवशी ४ प्रकरणे उघड झाली. बुधवारी सकाळच्या सत्रात हिंदी विषयाचा आणि दुपारच्या सत्रात जर्मन, जपानी, चिनी, पर्शियन विषयाचा पेपर घेण्यात आला. यात विभागवार चित्र पाहता नागपूर आणि लातूर या दाेन विभागात प्रत्येकी दाेन काॅपी प्रकरणे आढळून आली. पुणे, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक आणि कोकण विभागात एकही प्रकरण आढळून आले नाही.

Web Title : एचएससी परीक्षा: हिंदी पेपर में नकल के मामले, चार प्रकरण सामने आए।

Web Summary : एचएससी परीक्षा में हिंदी पेपर में नकल के चार मामले सामने आए, नागपुर और लातूर में दो-दो मामले दर्ज। निष्पक्ष परीक्षा सुनिश्चित करने के लिए सख्त उपाय किए गए हैं। पहले दिन बयालीस मामले सामने आए, जबकि दूसरे दिन चार मामले दर्ज किए गए। पुणे, मुंबई और अन्य मंडलों में कोई मामला सामने नहीं आया।

Web Title : HSC Exam: Copying incidents found in Hindi paper, four cases revealed.

Web Summary : HSC exams see four copying cases in Hindi paper, Nagpur, Latur each report two. Strict measures are in place to ensure fair exams. Forty-two cases were identified on the first day, with an additional four on the second day of testing. Pune, Mumbai, and other divisions reported no cases.