शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

नागरवस्तीतील ३५० जणी पालिकेच्या लाडक्या लेकी

By admin | Updated: September 22, 2015 03:26 IST

महापालिकेच्या लाडकी लेक योजनेचा ३५० जणींना लाभ झाला आहे. या प्रत्येकीला आता तिच्या वयाच्या १८व्या वर्षी किमान पावणेदोन लाख रुपये मिळतील

पुणे : महापालिकेच्या लाडकी लेक योजनेचा ३५० जणींना लाभ झाला आहे. या प्रत्येकीला आता तिच्या वयाच्या १८व्या वर्षी किमान पावणेदोन लाख रुपये मिळतील. नागरवस्ती विकास योजनेतंर्गत सुरू झालेल्या या योजनेला आणखी प्रतिसाद मिळावा, अशी महापालिकेची अपेक्षा आहे.स्त्री जन्मदराच्या घटत्या प्रमाणावर उपाय म्हणून महापालिकेने सन २०१३ मध्ये ही योजना सुरू केली. ज्यांचे वार्षिक उत्पन्न १ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशी कुटुंबे या योजनेसाठी पात्र आहेत. त्यांच्या घरात एप्रिल २०१३ नंतर जन्म झालेल्या मुलीसाठी ही योजना आहे. ही मुलगी पहिली, दुसरी किंवा भावाच्या पाठीवर जन्म झालेली असावी. (तिसरी नको) तिच्या नावे तिच्या परिसरातील लोकांनी, तिच्या नातेवाइकांनी किंवा ते शक्य नसेल तर तिच्या पालकांनी १० हजार रुपये जमा करायचे. १ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असल्याच्या तहसीलदाराच्या दाखल्यासह हे १० हजार रुपये महापालिकेत जमा करायचे. त्यानंतर महापालिका स्वत:चे २० हजार रुपये त्यात जमा करून एकूण ३० हजार रुपये त्या मुलीच्या नावावर बँकेत जमा करते. त्या मुलीच्या वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला किमान पावणेदोन लाख रुपये मिळतील. महापालिकेत या योजनेतील अर्जाचा तसेच बँकेसंदर्भातील निर्णय घेण्यासाठी नागरवस्ती विकास योजनेचे प्रमुख हनुमंत नाझीरकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी लेखा कळसकर व अन्य काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची स्वतंत्र समिती आहे. ज्या मुलीच्या नावे ठेव ठेवली असेल, तिच्या पालकांना ती मुलगी सज्ञान होईपर्यंत ही रक्कम काढता येणार नाही, अशी तरतूद करण्यात आली आहे. नियम, अटी निश्चित झाल्यानंतर सन २०१४ मध्ये ही योजना सुरू झाली. पहिल्याच वर्षी ३५० कुुटुंबांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांच्या नावे पालिकेने एकूण १ कोटी ५ लाख रुपयांची रक्कम बँकेत ठेव म्हणून ठेवली आहे. या वर्षीही या योजनेतंर्गत आतापर्यंतं १०० पेक्षा अधिक अर्ज आले आहेत. त्यांची तपासणी सुरू आहे.