हवेतील ३११ नविन कोरोनाबाधित रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:11 IST2021-04-23T04:11:52+5:302021-04-23T04:11:52+5:30

हवेली तालुक्यातील बाधितांची संख्या २५ हजार ३२७ पर्यंत पोहोचली असून कोरोनामुक्त झालेल्याची संख्या २२ हजार ८०९ आहे. गुरुवारी चार ...

311 new coronary artery disease patients | हवेतील ३११ नविन कोरोनाबाधित रुग्ण

हवेतील ३११ नविन कोरोनाबाधित रुग्ण

हवेली तालुक्यातील बाधितांची संख्या २५ हजार ३२७ पर्यंत पोहोचली असून कोरोनामुक्त झालेल्याची संख्या २२ हजार ८०९ आहे. गुरुवारी चार जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ४०८ झाली आहे. मृत्यूदर १.६१ टक्के आहे. सध्या २ हजार २०८ जणांवर उपचार सुरू असून त्यापैकी १० जण अत्यावस्थ आहेत. तर २५७ जण गृहविलगीकरणांत राहून उपचार घेत आहेत. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० . ९५ टक्के असून तालुक्यातील ८४० ठिकाणे कंन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.

डॉ सचिन खरात म्हणाले वारंवार आवाहन करूनही नागरिक आवश्यक ती सर्व काळजी न घेतल्याने रूग्णसंख्येत वाढ होत असताना दिसत आहे. तालुक्यातील नागरिक मास्क न वापरता फिरत असताना दिसत आहेत. ही धोकादायक बाब आहे. यांचेवर कारवाई करण्याची जबाबदारी पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनावर सोपवण्यात आली आहे. यापुढील काळात धडक कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असे अवाहन त्यांनी केले आहे.

Web Title: 311 new coronary artery disease patients