शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंगप्रकरणी ३ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

By admin | Updated: July 8, 2015 01:35 IST

चालत्या टेम्पोत अल्पवयीन मुलीचा विनयभंग आणि लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस ३ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा बारामतीच्या अतिरिक्त जिल्हा व सत्रन्यायाधीश आर. डी. सावंत यांनी ठोठावली.

बारामती : चालत्या टेम्पोत अल्पवयीन मुलीचा विनयभंग आणि लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस ३ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा बारामतीच्या अतिरिक्त जिल्हा व सत्रन्यायाधीश आर. डी. सावंत यांनी ठोठावली. तर क्रीडा शिक्षकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. प्रशांत ऊर्फ चिंगू लहू वाबळे असे शिक्षा झालेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. इयत्ता ९ वीच्या वर्गात त्यावेळी शिक्षण घेत असलेली पीडित मुलगी इंदापूर क्रीडा संकुलात तालुकास्तरीय खो खोच्या स्पर्धेसाठी तिच्या वर्गातील मुलामुलींसह क्रीडा शिक्षकाबरोबर पिकअप टेम्पोमध्ये बसून आली होती. परंतु, मुलींची स्पर्धा झाली नाही. मुलांचा संघ खेळल्यानंतर सर्व मुले मुली आलेल्या टेम्पोतून परत जाण्यासाठी निघाले. क्रीडा शिक्षक टेम्पो ड्रायव्हर शेजारी बसले होते. तर आरोपी प्रशांत ऊर्फ चिंगू हा टेम्पोच्या मागील कॅरेजमध्ये पीडित मुलीच्या शेजारी बसला होता. टेम्पो इंदापूर क्रीडा संकुल येथून निघाला. काही अंतर पुढे गेल्यावर धावत्या टेम्पोत वाबळे याने पीडित मुलीचा विनयभंग केला. खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अ‍ॅड. संदीप ओहाळ यांनी काम पाहिले. खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले होते. त्यापैकी पीडित मुलीचे वडील, इतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फितूर झाले होते. परंतु, पीडित मुलीची साक्ष ही विश्वासार्ह असल्याने ती ग्राह्य धरून आरोपीस शिक्षा ठोठावण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील अ‍ॅड. संदीप ओहोळ यांनी केला. तो ग्राह्य धरून न्यायालयाने वरीलप्रमाणे प्रशांत ऊर्फ चिंगू वाबळे यास शिक्षा सुनावली.