शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
14
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
15
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
16
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
17
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
18
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
19
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
20
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा

पीएमआरडीएला ३ टीएमसी पाणी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 1:19 PM

पुणे शहरात सध्या मंजूर कोट्यापेक्षा अधिक पाणी वापर होत असून, समान पाणीपुरवठा योजनेनंतर पाण्याची गळती थांबून मोठी बचत होणार असल्याचे स्पष्ट करत ही मंजुरी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देभविष्यात पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहरालगतच्या वाहतूक कोंडीवर संयुक्त तोडगा

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत नव्याने विकसित होणाऱ्या भागासाठी जलसंपदा विभागाने तीन टीएमसी पाणी देण्यास जलसंपदा विभागाने बुधवारी झालेल्या बैठकीत मंजुरी दिली असल्याची माहिती पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी येथे दिली. पुणे शहरात सध्या मंजूर कोट्यापेक्षा अधिक पाणी वापर होत असून, समान पाणीपुरवठा योजनेनंतर पाण्याची गळती थांबून मोठी बचत होणार असल्याचे स्पष्ट करत ही मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे भविष्यात पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा, पीएमआरडीए आणि पुणे शहराच्या विकासाची सध्य स्थिती व दिशा काय, याबाबत जिल्हाधिकारी सौरभ राव, महापालिका आयुक्त कुणाल कुमार आणि पीएमआरडीए आयुक्त किरण गित्ते यांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. या वेळी व्यासपीठावर संघाचे अध्यक्ष शैलेश काळे आणि सरचिटणी दिगंबर दराडे उपस्थित होते. या वेळी गित्ते यांनी ही माहिती दिली. .. पुण्याचे भविष्य उज्ज्वल पुणे शहरात या शहराची काळजी असणारे अनेक लोक, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी आहेत. यामुळे पुणे शहराला उज्ज्वल भविष्य असल्याचे मत महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी येथे व्यक्त केले. शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले मेट्रो, २४ बाय ७ समान पाणीपुरवठा, नदीकाठ सुधार योजना, केबल डक्ट, सायकल योजना अनेक प्रकल्प मार्गी लागणार आहेत. या विविध प्रकल्पांतर्गत येत्या पाच वर्षांत शहरामध्ये तब्बल ३२ हजार कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहेत. शहरामध्ये गेल्या दहा वर्षांत जी कामे झाली नाहीत, ती येत्या पाच वर्षांत  पूर्ण होणार आहेत. शहरासोबतच लगतच्या गावांमध्ये कचऱ्याची गंभीर समस्या आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी पुणे महापालिका आणि पीएमआरडीए यांनी संयुक्त प्रकल्प उभारण्याची गरज असल्याचे कुणाल कुणार यांनी स्पष्ट केले.गेल्या दोन-तीन वर्षांत शहर आणि जिल्ह्याच्या विकासाला गती देणारे प्रामुख्याने रिंगरोड, आतंरराष्ट्रीय विमानतळ, पुणे मेट्रो आदी अनेक मोठ्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. याबाबत प्रशासक प्रमुख म्हणून सौरभ राव, कुणाल कुमार आणि किरण गित्ते यांनी सविस्तर चर्चा केली.शहरालगतच्या वाहतूक कोंडीवर संयुक्त तोडगासध्या शहरालगतच्या हद्दीत प्रामुख्याने वाघोली, कात्रज, कोंढवा, हडपसर, खडकी या परिसरात होणारी वाहतूककोंडी दूर करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे. परंतु याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पीएमआरडीए आणि महापालिकेचा समान्वयातून विविध कामे करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी स्पष्ट केले. तर पीएमआरडीएच्या वतीने शहरालगत होणारी वाहतूककोंडी दूर करण्यासाठी सुमारे ११ ते १२ लहान-मोठे प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याचे गित्ते यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेPMRDAपीएमआरडीएkunal kumarकुणाल कुमारSaurabh Raoसौरभ रावKiran Gitteकिरण गित्ते