ज्येष्ठाकडून ३ लाखांचे मेफेड्रॉन जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:13 IST2021-09-15T04:13:28+5:302021-09-15T04:13:28+5:30

पुणे : सिंहगड रोडवर अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या या ६० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाला अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. शम्स ...

3 lakh mephedrone seized from senior | ज्येष्ठाकडून ३ लाखांचे मेफेड्रॉन जप्त

ज्येष्ठाकडून ३ लाखांचे मेफेड्रॉन जप्त

पुणे : सिंहगड रोडवर अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या या ६० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाला अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले.

शम्स महम्मद अली झवेरी (वय ६०, रा. काशीमीरा रोड, ईस्ट मुंबई) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून ३ लाख रुपयांचे २० ग्रॅम मेफेड्रॉन (एम डी), दोन मोबाईल, रोख रक्कम आणि कार असा ६ लाख २३ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथक पेट्रोलिंग करीत होते. वडगाव येथील नवले पुलाकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवरील चैतन्य बिअर शॉपीसमोर एका जण कारसह संशयितरीत्या थांबला असल्याचे या पथकाला आढळून आले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे २० ग्रॅम मेफेड्रॉन आढळून आले. मुंबईहून अमली पदार्थ विक्रीसाठी तो पुण्यात आला होता. झवेरी याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: 3 lakh mephedrone seized from senior