मळदला व्हॅनमधील प्रवाशांचे ३ लाख ८० हजार लुटले

By Admin | Updated: July 2, 2014 02:22 IST2014-07-02T02:22:05+5:302014-07-02T02:22:05+5:30

मळद (ता. दौंड) येथील उड्डाणपूल परिसरात ओमिनी गाडीतील प्रवाशांची लूटमार करून ३ लाख ८० हजारांचा ऐवज लंपास केला असल्याची माहिती ठाणे अंमलदार प्रभाकर बनकर यांनी दिली

3 lakh 80 thousand looted passengers in the mangled van | मळदला व्हॅनमधील प्रवाशांचे ३ लाख ८० हजार लुटले

मळदला व्हॅनमधील प्रवाशांचे ३ लाख ८० हजार लुटले

दौंड : मळद (ता. दौंड) येथील उड्डाणपूल परिसरात ओमिनी गाडीतील प्रवाशांची लूटमार करून ३ लाख ८० हजारांचा ऐवज लंपास केला असल्याची माहिती ठाणे अंमलदार प्रभाकर बनकर यांनी दिली.
सोलापूर येथील काही मंडळी आपल्या नातेवाइकांकडे पुण्याला डोहाळे जेवण करण्यासाठी गेले होते. दरम्यान, रात्री सोलापूर येथे परतीच्या प्रवासाला ओमिनी गाडीतून (क्र. एमएच १३ ए झेड ६७२१) निघाले होते.
या वेळी स्कॉर्पिओ गाडी त्यांचा पाठलाग करीत होती. मळद येथील उड्डाणपुलापासून काही अंतरावर रात्री साडेनऊच्या सुमारास ओमिनी गाडीला स्कॉपिओ गाडी आडवी लावण्यात आली.
या वेळी स्कॉर्पिओमधील चार अनोळखी चोरटे उतरले आणि प्रवाशांना म्हणाले, ‘आम्ही पोलीस आहोत, तुमच्या गाडीची तपासणी करायची.’ गाडीत दोन पुरुष आणि चार महिला होत्या. तेव्हा चोरटे गाडीजवळ आले. त्यांनी महिलांना धक्काबुकी करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले.
तसेच, मदन राऊत यांच्या पाकिटातील ३० हजार रुपये काढले. असा एकूण ३ लाख ८० हजारांचा ऐवज लंपास करून चोरटे भिगवण दिशेला पळून गेले. पळून जाताना ओमिनी गाडीची चावीदेखील चोरटे घेऊन पळाले.
घटनेचे वृत्त रावणगाव पोलिसांना कळविण्यात आले. घटनास्थळी ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोज लोहिया, अतिरिक्त अप्पर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे, पोलीस निरीक्षक सजन हंकारे आणि पोलिसांनी भेट दिली.
(वार्ताहर)

Web Title: 3 lakh 80 thousand looted passengers in the mangled van