लग्नाच्या आमिषाने ३ लाख ६५ हजारांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 01:18 IST2018-11-16T01:18:18+5:302018-11-16T01:18:45+5:30
मॅट्रोमोनी साइटवरून झाली होती ओळख

लग्नाच्या आमिषाने ३ लाख ६५ हजारांची फसवणूक
पुणे : मॅट्रोमोनी साईटवरून ओळख झाल्यानंतर मैत्री वाढवून लग्नाचे आमिष दाखवून महिलेची ३ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी सिंहगड रस्त्यावर राहणाऱ्या ३८ वर्षीय महिलेने दत्तवाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांची भारत मॅट्रोमोनी या सोशल नेटवर्किंग साइटवर ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात व्हॉट्सअॅपवरून चॅटिंग सुरू झाले. मैत्रीचे रूपांतर प्रेमात होवून आरोपीने त्यांना लग्नाचे आमिष दाखवले. काही दिवसांनंतर त्यांने विविध कारणे देत फिर्यादी यांना विविध खात्यात ३ लाख ६५ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.