कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर कार दुचाकीचा अपघातात ३ ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 11:50 IST2025-01-02T11:50:17+5:302025-01-02T11:50:53+5:30
ओतूर पोलीस स्टेशन येथे तवेरा कार चालकवर गुन्हा दाखल

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर कार दुचाकीचा अपघातात ३ ठार
ओतूर : कल्याण- अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील सितेवाडी गावच्या हद्दीत हॉटेल देवेंद्र समोर कार व दुचाकी यांची धडक झाली. या अपघातात मोटार सायकलवरील तीन जण ठार झाले असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कल्याण अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर बुधवार ( दि.१ ) जानेवारला दुपारी २.४५ सुमारास सितेवाडी येथील हॉटेल देवेंद्र समोर कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या मोटर सायकल एम. एच ०५ बी.एक्स ४८२४ व आळेफाटयाच्या दिशेने जाणाऱ्या एम.एच १६ ए. टी. ०७१५ तवेरा कारची धडक झाली. त्यात मोटार सायकलवरील निलेश ज्ञानेश्वर कुटे ( वय वर्ष ४०),जयश्री निलेश कुटे,( वय वर्ष ३५ ) कु.सान्वी निलेश कुटे ( वय वर्षे १४) तिघेही रा. पिंपरी पेंढार ता. जुन्नर मोठ्या प्रमाणात जखमी झाले होते तत्पर्तने ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ आणले असता डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता त्यांना मृत घोषित केले केले.
ओतूर पोलीस स्टेशन येथे तवेरा कार चालक दादासाहेब बन्सी फलके (वय ४३) रा. सुलतानपुर खुर्द ता. शेवगाव जि. अहमदनगर यांच्याविरुद्ध कायदेशीर फिर्याद दाखल झाली असून पुढील तपास ओतूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस सब इन्स्पेक्टर जाधव करत आहे.