अठ्ठावीस वर्षीय ठेकेदाराचा विहिरीत पडून मृत्यू; आंबेगाव तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 15:18 IST2023-03-31T15:18:26+5:302023-03-31T15:18:39+5:30
विहिरीत २५ ते ३० फुटावर पाणी असल्याने तो पाण्यात बुडाला

अठ्ठावीस वर्षीय ठेकेदाराचा विहिरीत पडून मृत्यू; आंबेगाव तालुक्यातील घटना
अवसरी: शिंगवे (ता. आंबेगाव) येथील गाढवे मळ्यात विहिरीचे रिंग टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रिंगच्या आतील बाजूचे बांबू काढताना ठेकेदार छोटू गुज्जर (वय २८, रा. हरिपत, राजस्थान) यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी घडली.
छोटू गुज्जर यांनी शेतकरी गाढवे यांच्या विहिरीचे रिंग टाकण्याचे काम घेतले होते. काम पूर्ण झाले असल्याने गुरुवारी दुपारी ४ च्या दरम्यान रिंगच्या आतील बाजूचे बांबू काढत असताना छोटू विहिरीत पडला होता . विहिरीत २५ ते ३० फुटावर पाणी असल्याने तो पाण्यात बुडाला होता. घटनेची माहिती कळताच पारगाव पोलिस ठाण्याचे स. पोलिस निरीक्षक लहू थाटे व टीम , स्थानिक ग्रामस्थ यांनी शोध कार्य सुरू केले आहे. विहिरीत पाणी उपसा करण्यासाठी मोटर लावण्यात आली होती. अथक प्रयत्नानंतर सात वाजेच्या दरम्यान त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. पुढील तपास पारगाव पोलिस करत आहे.