शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडी करणार्‍या सराईताकडून १३ लाखांचे २८ तोळे सोन्याचे दागिने जप्त; गुन्हे शाखेच्या युनिट ५ ची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 20:29 IST

शंभरावर घरफोड्या करणारा जयड्या.....

पुणे : शहराच्या विविध भागात घरफोडी करणार्‍या सराईत घरफोडी चोरट्याला गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून १२ लाख ६० हजार रुपयांचे २८ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहे. 

जयवंत गोधर्वन गायकवाड ऊर्फ जयड्या (वय ३२, रा. आंबेडकर वस्ती, औंध) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

गुन्हे शाखेचे युनिट ५ चे अधिकारी व कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना कारागृहातून सुटलेला आरोपी जयवंत गायकवाड याने मोठी घरफोडी केली असून तो सोलापूरला जाण्याच्या तयारी असल्याची माहिती हवालदार अजय गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने शिवाजीनगर गावठाणात घरफोडी केल्याची कबुली दिली. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तपासणी केली असताना २२ मार्च रोजी त्याने शिवाजीनगर गावठाणात घरफोडी करुन १२ लाख ६० हजार रुपयांचे २८ तोळे सोन्याचे लंपास केले होते. सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे अधिक तपास करीत आहेत.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे, प्रमोद टिळेकर, दीपक लांडगे, रमेश साबळे, दयाराम शेगर, संजय दळवी, स्नेहल जाधव यांच्या पथकाने केली.                                       .......                                                                                 

शंभरावर घरफोड्या करणारा जयड्याजयवंत ऊर्फ जयड्या गायकवाड हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. गायकवाड याने शहराच्या वेगवेगळ्या भागात सातत्याने घरफोड्या केल्या असून आतापर्यंत त्याने शंभरापेक्षा जास्त घरफोड्याचे गुन्हे केले आहेत. चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रेम वाघमारे व त्यांच्या पथकाने त्याला नोव्हेंबरमध्ये अटक केली होती. त्यावेळी त्याच्याकडून तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले होते. या गुन्ह्यांतून तो नुकताच जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर त्याने शिवाजीनगरमध्ये मोठी घरफोडी केली होत. परंतु, त्यातील दागिन्यांची विल्हेवाट लावण्यापूर्वीच त्याला पोलिसांनी पुन्हा पकडून चोरलेला सर्व ऐवज हस्तगत केला आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtheftचोरीThiefचोर