खेड घाटातील इंदिरा पाझर तलावात २६ वर्षीय युवकाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 20:11 IST2021-09-22T20:11:43+5:302021-09-22T20:11:51+5:30
खिश्यातील डायरीत नातेवाईकांचा मोबाईल नंबर मिळाल्यामुळं युवकाची ओळख पटली

खेड घाटातील इंदिरा पाझर तलावात २६ वर्षीय युवकाची आत्महत्या
राजगुरूनगर : खेड घाटातील इंदिरा पाझर तलावाच्या पाण्यात २६ वर्षीय युवकानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. (अझर वजीर शेख .रा पिंपळे गुरव पुणे ) असं युवकाचं नांव आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.
खेडपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सांडभोरवाडी ग्रामपंचायतचे शिपाई दयाराम विठ्ठल आरुडे यांना पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी सुरू करण्यासाठी इंदिरा पाझर तलावाच्या पाण्याजवळ गेले होते. त्यावेळी त्यांना एका युवकाचा मृतदेह पाण्यात तंरगंत असल्याचं दिसून आले. आरूडे यांनी या घटनेची माहिती खेड पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पाण्याबाहेर काढला.
पाण्यात माश्यांनी चेहरा खाल्यामुळे चेहरा ओळूख येत नव्हता. खिश्यातील डायरीत नातेवाईकांचा मोबाईल नंबर मिळाल्यामुळं २६ वर्षीय आत्महत्या केलेल्या युवकाची ओळख पटली आहे. मृतदेह शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास खेड पोलीस करत आहे.