शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भीमा-कृष्णा खोऱ्यात 238 टीएमसी पाणीसाठा; धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा चांगला परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 12:43 IST

जून आणि जुलै या दोन महिन्यात पावसाने दडी मारल्याने पाणी प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे निर्माण झाले होते.

ठळक मुद्देभीमा उपखोऱ्यात अद्यापही पन्नास टक्क्यांच्या खाली पाणीसाठा

पुणे : जिल्ह्यात संपूर्ण जुलै महिना कोरडा गेल्याने धरणांतीलपाणी साठ्याबाबात गंभीर परिस्थितीत निर्माण झाली होती. परंतु, गेल्या तीन-चार दिवसांपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. आज अखेर भीमा-कृष्णा खो-यात 238.67 टीएमसी म्हणजे 55.84 टक्के पाणीसाठा निर्माण झाला. यामध्ये भीमा उपखोऱ्यात अद्यापही पाणी साठा पन्नास टक्क्यांपेक्षा कमी असून, कृष्णा उपखोऱ्यातील धरणांमध्ये 70 टक्क्यांवर पोहचले आहे. यंदाच्या पावसाळा हंगामातील पहिले दोन महिने म्हणजे जुन, जुलैमध्ये पावसाने पूर्णपणे दाडी मारली. यामध्ये जुनच्या पहिल्या आठवड्यात चक्रीवादळामुळे संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे ओढे-नाले आणि नद्यांना पण पाणी आले. या चक्रीवादळात झालेल्या पावसावर शेतक-यांनी खरीप पिकांच्या पेरण्या केल्या. परंतु त्यानंतर तब्बल दोन महिने पावसाने दडी दिली. यामुळे पेरणी झालेली पिके धोक्यात आली होती. तसेच धरणांतील पाणी साठा 15-20 टक्क्यांवर आले होते. दर वर्षी 15 ऑगस्टपर्यंत धरणसाठा शंभर टक्के होत असे. परंतु यंदा पाऊसच न झाल्याने धरणांचा पाणी साठा खूपच कमी झाला होता. गेल्या काही दिवसांपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला असून, शुक्रवार (दि.8) रोजी देखील पाऊस सुरूच आहे. यामुळेच धरणासाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. भीमा खोऱ्यातील 27 धरणांमध्ये आज अखेर 90.90 टीएमसी म्हणजे 41.78 टक्के पाणीसाठ जमा झाला आहे. तर कृष्णा खो-यातील 12 धरणांमध्ये 147.77 टक्के म्हणजे तब्बल 70.41 टक्के पाणीसाठ तयार झाला आहे. गत वर्षी भीमा उपखो-यातील बहुतेक धरणे शंभर टक्के भरली होती. तर कृष्णा खोऱ्यातील धरणांमध्ये सरासरी 70-80 टक्के पाणीसाठा होता. या वर्षी हीच परिस्थितीत उलटी असून, कृष्णा खोऱ्यातील धरणांमध्ये चांगला पाणीसाठा तयार झाला असून, भीमा खोऱ्यातील धरणे अद्याप ही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. ----धरणांतील पाणी साठ्याची माहिती धरण          क्षमता (टीएमसी) आजचा साठा        टक्केवारीटेमघर         3.71                 1.29                 34.86वरसगाव     12.82               6.52                 50.85पानशेत       10.65              6.40                 60.07खडकवासला 1.97               1.69                85.53पवना          8.51               3.98                40.74मुळशी       18.47               10.56              57.15चासकमान 7.58                 1.73                 22.83भामाआसखेड 7.67            3.73                48.54माणिकडोह 10.17             1.50                14.71येडगाव       1.94               0.74               38.64डिंभे          12.49             5.33               42.64उजनी।        53.57            9.60                17.91

टॅग्स :PuneपुणेDamधरणWaterपाणीRainपाऊसFarmerशेतकरी