सासरच्या त्रासाने २२ वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी मारून संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 18:15 IST2021-08-23T18:14:48+5:302021-08-23T18:15:09+5:30
जुन्नरच्या वडगाव कांदळी येथील घटना; सात जणांवर गुन्हा दाखल

सासरच्या त्रासाने २२ वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी मारून संपवलं जीवन
वडगाव कांदळी : सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहितेने विहिरीत उडी मारत जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नेहा अमोल पवार( वय २२) असे विवाहितेच नाव आहे. तर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी नारायणगाव पोलिसांकडून नवरा, सासू, सासरा, दीर यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
वडगाव कांदळी येथील नवरा अमोल अनंथा पवार, सासरा आनंथा हरिभाऊ पवार, सासू कमल अनंथा पवार, दीर प्रवीण आनंथा पवार, जावु निर्मला प्रवीण पवार, सुप्रिया नितीन पवार, चुलत सासरे भिकाजी हरिभाऊ पवार (सर्व राहणार वडगाव कांदळी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव कांदळी येथील संदीप वसंत पाचपुते यांची मुलगी नेहा व अमोल यांचा विवाह मार्च २०२० मध्ये झाला होता. विवाहानंतर आरोपींनी नेहा हिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. सासरच्या सततच्या त्रासाला कंटाळून नेहा १९ ऑगस्टला घरातून बेपत्ता झाली होती. शनिवारी २१ तारखेला नेहा हीचा मृतदेह त्यांच्या घराजवळ असलेल्या विहिरीत आढळून आला. या प्रकरणी नेहाचे वडील संदीप पाचपुते यांनी दिलेल्या फिर्यादी वरून सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनियुक्त पोलीस निरीक्षक विलास देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास फौजदार धनवे करत आहेत.