पुणे विभागात २१३ टँकर; सर्वाधिक आंबेगावात २१ टँकरने पाणीपुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 08:47 IST2025-05-13T08:47:21+5:302025-05-13T08:47:59+5:30
आंबेगाव तालुक्यात तालुक्यात ४१ हजार ४४० नागरिकांना २१ टँकरच्या मदतीने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

पुणे विभागात २१३ टँकर; सर्वाधिक आंबेगावात २१ टँकरने पाणीपुरवठा
पुणे : कडक उन्हामुळे पुणे विभागातील चारही जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्यावर विपरित परिणाम झाला असून, विभागात २१३ टँकरच्या माध्यमातून १ हजार २४९ वाड्या, २०८ गावे, ३ लाख ७० हजार नागरिक आणि २ लाख ६५ हजार जनावरांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
विभागातील सर्वाधिक ८३ टँकर पुणे जिल्ह्यात सुरू असून, आंबेगाव तालुक्यात तालुक्यात ४१ हजार ४४० नागरिकांना २१ टँकरच्या मदतीने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विभागातील सर्वाधिक ८३ टँकर पुणे जिल्ह्यात सुरू असून, आंबेगाव तालुक्यात तालुक्यात ४१ हजार ४४० नागरिकांना २१ टँकरच्या मदतीने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर, तालुकानिहाय संख्या लक्षात घेता सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात ५१ टँकरच्या साहाय्याने ७१ हजार ७५० नागरिक आणि ४९ हजार जनावरांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
पुणे विभागात मार्चपासूनच उन्हाचे चटके जाणविण्यास सुरुवात झाली आहे. पर्यायाने पाण्याचे स्त्रोत आटू लागले असून, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विभागातील कोल्हापूर वगळता पुण्यासह सातारा, सांगली, सोलापूर या चारही जिल्ह्यांत खासगी, तसेच शासकीय टँकरच्या माध्यमातून नागरिक, जनावरे यांना पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली. मार्चपेक्षा एप्रिल आणि मेमध्ये पाण्याच्या टँकरमध्ये चांगलीच वाढ झाली आहे.