ओतूर वनविभागाच्या धडक कारवाईत २०१ किलो चंदन जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 20:17 IST2025-05-07T20:16:12+5:302025-05-07T20:17:27+5:30

मोबाईल फोन चार चाकी गाडी व २०१ किलो वजनाच्या तुकडे असा एकूण १ ५ लाख  ९५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

201 kg sandalwood seized in Otur Forest Department raid | ओतूर वनविभागाच्या धडक कारवाईत २०१ किलो चंदन जप्त

ओतूर वनविभागाच्या धडक कारवाईत २०१ किलो चंदन जप्त

ओतूर : जुन्नर तालुक्यातील जाधववाडी (बोरी बुद्रुक) येथून चंदन लाकडांचे अवैध्य वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती वनविभागाच्या स्टॉप यांना कळाली असता त्या ठिकाणी धाड टाकता चंदन लाकडांची अवैध वाहतूक होत असल्याचे आढळून आले. वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ व वन विभागाच्या पथकाने धाड टाकली असता लहू सोमनाथ धुळे यांच्या गाडीची तपासणी करत असताना गाडीत आठ गोणी चंदनाचे तुकडे, वजन काटा व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. मोबाईल फोन चार चाकी गाडी व २०१ किलो वजनाच्या तुकडे असा एकूण १ ५ लाख  ९५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या धडक कारवाईत संशयित आरोपी लहु धुळे हा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला असून त्याला शोधण्यासाठी वनविभागाची चार पथके रवाना करण्यात आली असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल अशी माहिती जुन्नरचे सहायक वनसंरक्षक अमृत शिंदे यांनी दिली आहे.

सदरची कारवाई जुन्नर उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक अमृत शिंदे,ओतुर वनपरिक्षेत्र अधिकारी लहु ठोकळ, वनपाल,वनरक्षक, वनविभागाचे कर्मचारी, आळेफाटा पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांच्या समवेत पार पडली असून पुढील तपास ओतुर वनपरिक्षेत्र अधिकारी लहु ठोकळ हे करत आहे.  

Web Title: 201 kg sandalwood seized in Otur Forest Department raid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.