पुणे: ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ सायकल स्पर्धेसाठी सोमवारी (दि. १९) शहरातील अनेक महत्त्वाचे रस्ते बंद राहणार आहे. याचा फटका पीएमपीच्या नियोजित फेऱ्यांवर होणार आहे. परिणामी, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, जंगली महाराज रस्त्यावरून धावणाऱ्या पीएमपी बस दुसऱ्या मार्गावरून धावणार आहे. दरम्यान, जवळपास दोन हजार फेऱ्या होणार असून, दीडशेपेक्षा जास्त बसचे मार्ग बदलण्यात आले आहे.
पुणे जिल्हा प्रशासन आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने दि. १९ ते २४ जानेवारीदरम्यान ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकल शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत सोमवारी ‘प्रोलॉग’ स्पर्धा होणार आहे. खंडुजीबाबा चौक-नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौक (गुडलक चौक)-तुकाराम महाराज पादुका चौक-ललित महल चौक-चापेकर चौक-रेंजहिल्स-भाऊसाहेब खुडे नारायणगावकर चौक (सिमला ऑफिस चौक)-नेताजी सुभाषचंद्र बोस चौक (संचेती चौक)-झाशीची राणी लक्ष्मीबाई चौक (बालगंधर्व)-डेक्कन जिमखाना बसस्थानक असा स्पर्धेचा मार्ग असणार आहे. त्यामुळे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, विद्यापीठ रस्ता आणि जंगली महाराज रस्ता व त्यांना जोडणारे उपरस्ते वाहतुकीसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहेत. या मार्गावर असलेले पीएमपीचे डेक्कन बसस्थानक बंद ठेवण्यात येणार आहे. जंगली महाराज आणि फर्ग्युसन रस्ता बंद असल्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या तब्बल अडीच हजार फेऱ्या रद्द होणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांना जोडणाऱ्या बस बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांना सर्वाधिक फटका बसणार आहे. पीएमपीने पुण्यातून पिंपरीत जाणाऱ्या काही बस सेनापती बापट रस्ता आणि पुणे स्टेशन मार्गे वळविण्याचा निर्णय घेतला आहे. दिवसभरात पीएमपीच्या या मार्गावरील फेऱ्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
Web Summary : The Pune Grand Challenge cycling tour on January 19th will close key city roads, leading to the cancellation of approximately two thousand PMPML bus trips and rerouting of over 150 buses, causing inconvenience to commuters.
Web Summary : 19 जनवरी को पुणे ग्रैंड चैलेंज साइकिल टूर के कारण शहर के प्रमुख मार्ग बंद रहेंगे, जिससे लगभग दो हजार पीएमपीएमएल बस यात्राएं रद्द हो जाएंगी और 150 से अधिक बसों का मार्ग बदल दिया जाएगा, जिससे यात्रियों को असुविधा होगी।