रिल्स लाईक करा सांगून दोन इंजिनियरसह एका गृहिणीची २० लाखांची फसवणूक

By भाग्यश्री गिलडा | Published: November 5, 2023 03:19 PM2023-11-05T15:19:55+5:302023-11-05T15:20:06+5:30

पैशाचे आमिष दाखवून पुण्यातील तिघा महिलांची फसवणूक केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत

20 lakh fraud of a housewife along with two engineers by asking them to like reels | रिल्स लाईक करा सांगून दोन इंजिनियरसह एका गृहिणीची २० लाखांची फसवणूक

रिल्स लाईक करा सांगून दोन इंजिनियरसह एका गृहिणीची २० लाखांची फसवणूक

पुणे : रिल्स लाईक करा, गुंतवणूक करा त्यातून चांगला पैसे मिळेल असे आमिष दाखवून पुण्यातील तिघा महिलांची फसवणूक केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. ०४) एकाच दिवसात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये याबाबतच्या फिर्याद दाखल केल्या आहेत.

पहिल्या घटनेत कोथरूड परिसरात राहणाऱ्या २५ वर्षीय इंजिनियर महिलेने फिर्यादी दिली आहे. त्यानुसार त्यांना अनोळखी क्रमांकावरून पार्टटाइम नोकरी करण्यासाठी व्हाॅट्सॲपवर मेसेज आला. पार्टटाइम नोकरीसाठी सहमत असल्याचे सांगितल्यावर त्यांना एका टेलिग्राम ग्रुपमध्ये ॲड करण्यात आले.  वेगवेगळे रिल्स लाईक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगितले. सुरुवातीला काही प्रमाणात मोबदला देऊन विश्वास संपादन केला. वेगवेगळी कारणे सांगून तक्रारदार यांच्याकडून तब्बल १० लाख ८९ हजार रुपये भरण्यास भाग पडले. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दुसऱ्या घटनेमध्ये हडपसर परिसरात राहणाऱ्या एका ३४ वर्षीय गृहिणीने फिर्याद दिली आहे. पार्टटाइम जॉब तसेच गुंतवणूक केल्यास चांगला मोबदला देऊ असे सांगून महिलेला विश्वासात घेतले. महिने ४ लाख ५१ हजारांची गुंतवणूक केल्यावर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसऱ्या घटनेमध्ये कर्वेनगर परिसरात राहणाऱ्या ३७ वर्षीय महिलेची गुंतवणूक करा चांगला मोबदला मिळेल असे सांगून ४ लाख ८ हजार रुपये भरण्यास सांगून कोणताही परतावा न देता फसवणूक केली. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title: 20 lakh fraud of a housewife along with two engineers by asking them to like reels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.