Video: एका मिनिटांत सांगते भारतातील १८ राज्यांची राजधानी; २ वर्षांच्या चिमुकलीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डकडून दखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 12:55 IST2025-10-31T12:54:13+5:302025-10-31T12:55:24+5:30
ती जेव्हा अवघ्या १४ महिन्यांची होती. तेव्हापासून तिचे संपूर्ण नाव, पत्ता, तिच्या वडिलांचा, आईचा व आजोबाचा मोबाइल नंबर तोंडपाठ आहे.

Video: एका मिनिटांत सांगते भारतातील १८ राज्यांची राजधानी; २ वर्षांच्या चिमुकलीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डकडून दखल
हडपसर : पुण्यातील हडपसर भागात राहणाऱ्या २ वर्षांच्या चिमुकलीच्या बुद्धिमत्तेचे प्रचंड कौतुक होत आहे. मीरा ऐश्वर्या गौरव भट्टड असे या मुलीचे नाव आहे. एवढ्या लहान वयात तिची कमालीची आकलन क्षमता दिसून आली आहे. याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. मीराने केवळ १ मिनिटात भारतातील राज्ये लक्षात ठेवून त्यांच्या राजधानी सांगितल्या आहेत. यावरून चिमुकली अत्यंत हुशार असल्याची चर्चा होऊ लागली आहे.
एका मिनिटांत सांगते भारतातील १८ राज्यांची राजधानी; २ वर्षांच्या चिमुकलीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डकडून दखल#Pune#India#states#child#indiabookofrecordpic.twitter.com/PQaK3SHte0
— Lokmat (@lokmat) October 31, 2025
मीराने वय वर्ष फक्त २ असताना तिने केवळ १ मिनिट ७ सेकंदात भारतातील १८ राज्य व त्याच्या राजधानी हे लक्षात ठेवून स्वतःहून सांगितले. याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली. तिला पारितोषिके प्राप्त झाली आहे. हे करण्यासाठी तिला तिच्या आईचे (ऐश्वर्या भट्टड राठी) विशेष योगदान प्राप्त झाले होते. त्यांनी तिला रोज हसत खेळत ३/४ राज्य व राजधानी शिकवत गेली. मीराने सुद्धा त्याची रोज हसत खेळत उजळणी करायची.
तसेच घरातील इतर मंडळी सुद्धा हे बघून नवलच वाटले. व त्यांनी सुद्धा हसत खेळत तिच्याबरोबर रोज खेळीमेळीच्या वातावरणात बोलायला सुरू केले. तिची आकलन क्षमता कमालीची आहे. ती जेव्हा अवघ्या १४ महिन्यांची होती. तेव्हापासून तिचे संपूर्ण नाव, पत्ता, तिच्या वडिलांचा, आईचा व आजोबाचा मोबाइल नंबर तोंडपाठ आहे.