सोमवारी १९६ कोरोनाबाधित, तर २८८ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:09 IST2021-07-20T04:09:12+5:302021-07-20T04:09:12+5:30

पुणे : शहरात सोमवारी १९६ कोरोनाबाधित आढळून आले असून, २८९ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर ...

196 coronated on Monday, 288 coronated | सोमवारी १९६ कोरोनाबाधित, तर २८८ कोरोनामुक्त

सोमवारी १९६ कोरोनाबाधित, तर २८८ कोरोनामुक्त

पुणे : शहरात सोमवारी १९६ कोरोनाबाधित आढळून आले असून, २८९ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर ६ हजार २७७ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ३़ १२ टक्के इतकी आढळून आली आहे़

शहरातील सक्रिय रुग्णसंख्या २ हजार ८५५ इतकी असून, आज दिवसभरात १० जणांचा मृत्यू झाला आह़े यापैकी ४ जण हे पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १़ ७९ टक्के इतका आहे़

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही २३५ इतकी असून, आॅक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ४८७ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २७ लाख ९२ हजार ९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८४ हजार ८० जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ७२ हजार २५९ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ६९६ जणांचा मृत्यू झाला आहे.

--------

Web Title: 196 coronated on Monday, 288 coronated