मध्य शहरातील १७ रस्ते बंद

By Admin | Updated: September 14, 2016 03:55 IST2016-09-14T03:55:17+5:302016-09-14T03:55:17+5:30

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शहरातील महत्त्वाचे १७ रस्ते बंद राहणार असून, लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणूक अलका चित्रपटगृहाजवळील टिळक चौकात पहिला मानाचा गणपती

17 closed roads in central city | मध्य शहरातील १७ रस्ते बंद

मध्य शहरातील १७ रस्ते बंद

पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शहरातील महत्त्वाचे १७ रस्ते बंद राहणार असून, लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणूक अलका चित्रपटगृहाजवळील टिळक चौकात पहिला मानाचा गणपती आल्यानंतर खंडोजीबाबा चौकापासूनची वाहतूक बंद करण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ़ प्रवीण मुंढे यांनी सांगितले़
शिवाजी रोड (काकासाहेब गाडगीळ पुतळा ते जेधे चौक), लक्ष्मी रोड (संत कबीर चौकी ते टिळक चौक), बगाडे रोड (सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौक), बाजीराव रोड (बजाज पुतळा चौक ते फुटका बुरुज चौक), कुमठेकर रोड (टिळक चौक ते चितळे कॉर्नर चौक), गणेश रोड (दारूवाला पूल ते जिजामाता चौक), केळकर रोड (बुधवार चौक ते टिळक चौक), टिळक रोड (जेधे चौक ते टिळक चौक), शास्त्री रोड (सेनादत्त चौकी चौक ते टिळक चौक), जंगलीमहाराज रोड (झाशी राणी चौक ते खंडोजी बाबा चौक), कर्वे रोड (नळ स्टॉप चौक ते खंडोजीबाबा चौक), फर्ग्युसन रोड (खंडोजी बाबा चौक ते फर्ग्युसन कॉलेज गेट), भांडारकर रोड (पीवायसी जिमखाना ते गुडलक चौक ते नटराज चौक), पुणे-सातारा रोड (व्होल्गा चौक ते जेधे चौक), प्रभात रोड (डेक्कन पोलीस स्टेशन ते शेलारमामा चौक) हे विसर्जन मिरवणुकीत आवश्यकतेनुसार बंद राहणार आहेत़

Web Title: 17 closed roads in central city