शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पुणे पोलिसांच्या १५ पथकांनी एकाचवेळी केली ५ शहरात कारवाई ; जळगावमधील बीएचआर प्रकरणात १२ जण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 20:21 IST

पुणे शहरातून १६ गाड्यांतून १५ पथके बुधवारी दुपारी पुण्यातून वेगवेगळ्या शहरात रवाना झाले होते.

पुणे : जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) फसवणूक व अपहार प्रकरणात पुणे पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी जळगाव, धुळे, औरंगाबाद, मुंबई आणि पुणे शहरात एकाच वेळी १५ पथकांच्या मार्फत कारवाई केली असून १२ जणांना ताब्यात घेतले आहे. 

मद्य व्यावसायिक भागवत भंगाळे, जामनेर पंचायत समितीचे माजी सभापती छगन झाल्टे(रा. जामनेर), जामनेर शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, राजेश लोढा (रा. जामनेर), अंबादास मानकापे (रा. औरंगाबाद), जयश्री अंतिम तोतला, संजय तोतला (रा. मुंबई), प्रमोद कापसे (रा. अकोला), प्रितेश चंपालाल जैन (रा. धुळे), असिफ मुन्ना तेली (रा. भुसावळ), प्रेम नारायण कोगटा (रा. जळगाव) यांचा ताब्यात घेतलेल्यांमध्ये समावेश आहे. 

पोलिसांनी ताब्यात घेतेले हे आरोपी मातब्बर असून, त्यातील काहींची राजकीय पार्श्वभूमी तर काही मोठे व्यवसायिक आहेत. भागवत भंगाळे हे हॉटेल व्यावसायिक असून, २५ पेक्षा अधिक  त्यांच्या बिअर शॉपी आहेत. दारू विक्रीचा प्रमुख वितरक आहे. नातेवाईकांबरोबर स्वता:ची देखील राजकीय पार्श्वभूमी आहे. छगन झाल्टे हे जामनेर पंचायत समितीचे माजी सभापती असून नगरसेवक देखील होते. जितेंद्र पाटील हे शिक्षण सम्राट असून, पत्नी नगरसेविका तसेच ते जामनेर तालुका शिक्षण संस्थेचे पदाधिकारी आहेत़ भुसावळ येथील आसिफ तेली हे माजी नगरसेवक आहे. जयश्री मणियार या प्लास्टो चे प्रमुख उद्योगपती श्रीकांत मणियार यांची सुन आहेत. संजय तोतला हे  जळगाव स्थित मोठे व्यवसायिक आहेत. प्रेम कोगटा हे जळगाव येथील दाल मिल असोसिएशनचे पदाधिकारी असून, मोठे व्यावसायिक आहेत. राजेश लोढा शिक्षण संस्थेचे संचालक आहेत. प्रितेश जैन भुसावळ येथील व्यावसायिक आहेत. अंबादास मानकापे हे औरंगाबद स्थित व्यावसायिक असून, एका दैनिकाचे मालक अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची पार्श्वभूमी आहे. 

पुणे शहरातून १६ गाड्यांतून १५ पथके बुधवारी दुपारी पुण्यातून वेगवेगळ्या शहरात रवाना झाले होते. त्यांना गुरुवारी सकाळी ६ वाजता नेमून दिलेल्या ठिकाणी पोहचण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर गुरुवारी सकाळी ६ वाजता एकाचवेळी वेगवेगळ्या शहरात पोलिसांच्या या पथकांनी छापेमारी सुरु केली. सुमारे २ तासात सर्वांना ताब्यात घेण्यात आले.

बीएचआर पतसंस्थेचे आवसायक जितेंद्र कंडारे यानेच आवसानीत काढण्यात आलेल्या पतसंस्थेत मोठा गैरव्यवहार करुन भ्रष्टाचार केला. त्यात त्याने अनेकांना त्यांच्या ठेवीच्या ३० ते ४० टक्के पैसे देऊन त्यांना १०० टक्के पैसे मिळाल्याचे लिहून घेतले. आज पकडण्यात आलेल्यांनी बीआरएच पतसंस्थेकडून घेतलेल्या कर्जाच्या बदल्यात ठेवीदारांना त्यांच्या ठेवीच्या ३० ते ४० टक्के पैसे देऊन त्यांना १०० टक्के पैसे परत केल्याचे दाखविले. व त्यातून आपले कर्ज परतफेड केल्याचे दाखविले होते. 

पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात  जळगाव मध्ये एकाचवेळी अनेक ठिकाणी कारवाई केली होती. त्यातून बीएचआर पतसंस्थेमधील घोटाळ्यातील अनेक जणांना पकडण्यात आले होते. तसेच मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे हस्तगत करण्यात आली होती. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव जिल्ह्यात अनेक वेळा कारवाई केली आहे. नोव्हेंबर प्रमाणेच आज पुन्हा एकदा मोठी कारवाई पुणे पोलिसांनी केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. 

त्यापैकी मुंबई, पुणे आणि औरंगाबादमधून ताब्यात घेतलेल्या चौघांना आज पुण्यात आणून अटक केली असून त्यांना सायंकाळी उशिरा न्यायालयात हजर करण्यात आले आहे.                                                                                                                                       १०० कोटींचा गैरव्यवहारपोलिसांनी ताब्यात घेतलेल्या १२ जणांकडील कर्ज व त्यांनी ठेवीदारांचा केलेला विश्वासघात याची रक्कम सुमारे १०० कोटी रुपयांपर्यंत आल्याचे आजवरच्या तपासात पुढे आले आहे. पहिल्या कारवाईच्या वेळीही आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने छापे घालेपर्यंत कोणाला याचा सुगावा लागू दिला नाही. त्याचप्रमाणे यावेळीही ही पथके त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर रात्रीच पोहचली होती. एका पथकात १ अधिकारी व ४ कर्मचार्‍यांचा समावेश होता. या सर्व पथकांना पुण्यात बसून पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके व त्यांचे सहकारी रात्रभर मार्गदर्शन करत होते.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसbankबँकfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी